आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथ पत्रातच केला गोंधळ, संशयित येणार गोत्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिका नविडणुकीत शासनाने उमेदवारांना गुन्ह्यांविषयी दाखल करण्यासाठी दिलेल्या शपथपत्रातील मजकूर धाब्यावर बसवत त्यात मनपा प्रशासनाने फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयितांनाही नगरसेवक व्हायला अडचण आली नाही. मात्र, आता शपथपत्रातच फेरफार झाल्याची बाब पुढे आल्यामुळे गुन्हे दाखल असलेले नगरसेवक गोत्यात आले आहेत. शहरातील जवळपास १० पेक्षा जास्त नगरसेवक यामध्ये अपात्र होऊ शकतात, असे पुढे आले आहे. शपथपत्रात फेरफार करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.

राज्य नविडणूक आयोगाने दिलेल्या शपथपत्रात या संशयित उमेदवारांवर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकेल, असे गुन्हे दाखल आहेत काय, याची विचारणार करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या नविडणूक निर्णय अधिकारी त्या अधिकाऱ्याला सहकार्य करणाऱ्या यंत्रणेने शासनाचे शपथपत्र जसेच्या तसे देता त्यात बदल करून पहिल्या काॅलममध्ये गुन्हे दाखल असलेल्या ठिकाणी तुम्हाला दोषी ठरवण्यात आले आहे काय, अथवा दोषी ठरल्यानंतर दोन वर्षांची शिक्षा झाली आहे काय, असे नमूद केले आहे. महापालिकेच्या या शपथपत्रात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनीही नकार दिला. कारण त्यांना कोणत्याही गुन्ह्यात दाेषी ठरवले गेलेले नव्हते. कोणत्याही न्यायालयाने त्यांना शिक्षा दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी नकार देणे अपेक्षित होते. त्यामुळे या संशयित उमेदवारांचा नविडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. शहरात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असे जवळपास १०पेक्षा जास्त नगरसेवक सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. साध्या शविीगाळ केल्याच्या गुन्ह्यातही दाेन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते. नविडणुकीत मात्र ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांनीही शिक्षा झाली नाही, असे नमूद केले आहे.

^नविडणुकीत दिलेले प्रतजि्ञापत्र बरोबर अचूक आहे. धुळे महापालिकेच्या सन २०१३च्या नविडणुकीत परिशिष्ट चे प्रतजि्ञापत्राचा नमुना काय हेतू ठेवून चुकीचा देण्यात आला. राज्य नविडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या परिशिष्ट मधील मजकुरात जाणीवपूर्वक फेरबदल करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच याची सखोल चौकशी करून तक्रारीची दखल घ्यावी याचा लेखी खुलासा १५ दविसांत करण्यात यावा. नरेंद्रपरदेशी , नगरसेवक

^नविडणूक आयोगाने दिलेल्या नियमात बदल करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा प्रकारे बदल करूच शकत नाही. त्या वेळी नविडणूक प्रक्रियेच्या कागदावर स्वाक्षरी असतील. त्याबाबत कागदपत्रांचा रेकॉर्ड असेलच. तरी नरेंद्र परदेशी यांनी दिलेल्या नविेदनाप्रमाणे त्याची माहिती घेण्यात येईल. त्याप्रमाणे त्यावर पुढील कार्यालयीन कार्यवाही करण्यात येईल. बदल झालेल्या भागाची माहिती घेतली जाईल. डॉ.नामदेव भोसले, आयुक्त, मनपा, धुळे

महापालिकेने बदलवलेले शपथपत्र
१)मला, दोषसिद्धीनंतर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कैद झालेल्या खालील अपराधांप्रकरणी दोषी ठरवलेले असून, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ) दोषी ठरवण्यात आलेल्या अपराधाच्या कायद्याचे कलम आणि गुन्ह्याचा तपशील.
ब) ज्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे त्या न्यायलयाचे नाव.
क) दावा क्रमांक
ड) दोषसिद्धीचा दिनांक

२) एक किंवा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता कैद झालेल्या खालील अपराधांबाबत (ज्याच्या दोषसिद्धी शिक्षेमुळे मला नविडणूक लढवण्याकरिता अपात्र ठरवता येईल. ते सोडून इतर अपराध) दोषी असून, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

नविडणूक आयोगाचे शपथपत्र
१)दोषसिद्धीनंतर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कैद होऊ शकेल, अशा खालील अपराधांचा आरोप असून, आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अ) कायद्याचे कलम दखल घेण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपशील
ब) ज्या न्यायालयाने दखल घेतली. त्या न्यायालयाचे नाव
क) दावा क्रमांक
ड) न्यायालयाने दखल घेतलेल्या आदेशाचा दिनांक

२) मला खालील अपराधांसाठी दाेषी ठरवण्यात आले आहे. (ज्या अपराधांच्या सिद्धीमुळे आिण शिक्षेमुळे मला नविडणूक लढवण्याकरिता अपात्र ठरवता येईल, अशा अपराधाव्यतिरिक्त) आिण एक वर्षे किंवा त्यापेक्षा अिधक कालावधीच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.