आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँंग्रेस उतरणार रस्त्यावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- राज्यकेंद्र सरकार हे भांडवलदार, उद्याेजकांचे अाहे. या शासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जिव्हाळा नाही. सरकारचे धाेरण हे शेतकरी विराेधी असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणे आवश्यक असून, कपाशीला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव देण्याची गरज आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँंग्रेसने रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार जुलै राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्याचा निर्णय काँंग्रेसच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात अाला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभरात अांदाेलन करण्याची सूचना कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केली अाहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या जिल्हा शाखेची बैठक रविवारी दुपारी कॉंग्रेस भवनात झाली. या वेळी पक्षाच्या जिल्ह्याच्या प्रभारी अॅड. ललिता पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मधुकर गर्दे, बाजार समितीचे सभापती गुलाबराव काेतेकर अादी उपस्थित हाेते. जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर म्हणाले की, पीककर्ज अाणि सिंचन अादी प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काँंग्रेसकडून हे अांदाेलन केले जाणार अाहे.

काँंग्रेसच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या याेजना राबवण्यात अाल्या. मात्र, आताचे केंद्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या िवराेधात धाेरण राबवत अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी कांॅग्रेस असल्याचे सरकारला दाखवून द्यावयाचे असल्याचे ते म्हणाले. प्रभाकर चव्हाण यांनीही माेर्चाबाबत भूमिका मांडली. युवराज करनकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री राेहिदास पाटील करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या वेळी राजेंद्र देवरे, िकशाेर पाटील, प्रा. धनराज रवंदळे, खलिल अन्सारी, रावसाहेब पाटील, भगवान पाटील, याेगिता पवार, वानूबाई िशरसाठ, शकील अहमद, श्यामकांत ईशी, प्रदीप चाैधरी, प्रकाश पाटील, भिवसन अहिरे उपस्थित हाेते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा कांॅग्रेस हा एकमेव पक्ष अाहे. कांॅग्रेसची नाळ शेतकऱ्यांशी जुळली अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढण्यात येणाऱ्या माेर्चात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. माेर्चात सहभागी हाेणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दखल पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. -अॅड.ललिता पाटील, जिल्हा प्रभारी, काँंग्रेस