आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा घेराव; पालकमंत्र्यांची त्रेधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नियाेजन सभेसाठी वर्षभरानंतर प्रथमच उघडलेल्या गेटमधून जाण्याचे नियाेजन उधळून लावत काँग्रेसच्या अांदाेलकांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला. कापसाला अनुदानातून वगळल्याचा राग पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर काढत अांदाेलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गेटमध्येच वाहन अडवल्यामुळे प्रश्नांची सरबत्ती एेकून घेतल्यानंतर पालकमंत्री भुसे अामदारांसाेबत गेटपासून पायी चालत नियाेजन समितीच्या बैठकीला गेले. अामदार कुणाल पाटील श्यामकांत सनेर यांनी या वेळी पालकमंत्र्यांना जाब विचारला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात साेमवारी बरेच बदल दिसून अाले. गेल्या वर्षभरापासून दुसरे गेट बंद ठेवण्यात अाले अाहे. त्याचवेळी त्याचबाजूचे इमारतीचे गेटही बंद अाहे. मात्र, साेमवारी हे दाेन्ही गेट उघडण्यात अाले हाेते. कारण मुख्य गेटवर काँग्रेसचे अांदाेलन सुरू हाेते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावरून कांॅग्रेसचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सकाळपासून उपाेेषणाला बसले हाेते. अामदार अमरिश पटेल, कुणाल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर इतरही नेत्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्याची तयारी केली हाेती. मात्र, त्याचवेळी प्रशासनाने काँग्रेसचा राेष पाहून जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुसरे गेट उघडले. त्यातून पालकमंत्र्यांना नियाेजन समितीच्या सभेत नेण्याची तयारी सुरू हाेती. दुपारी वाजता नियाेजन सभा हाेणार हाेती. मात्र वाजेपर्यंत पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात पाेहाेचलेच नव्हते. त्यामुळे अांदाेलक संतप्त हाेत हाेते. अखेर दुपारी वाजून ५० मिनिटांनी पालकमंत्र्यांचे वाहन अाले. दुसऱ्या गेटमधून त्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वीच कांॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवले. त्याचवेळी पालकमंत्र्यांना अांदाेलनस्थळी नेण्यात अाले. या वेळी कापसाच्या मुद्द्यावरून प्रश्नांची एकच सरबत्ती सुरू झाली. कापसाचे उत्पन्न कमी असताना कापसाला दर नाही. अाता शासनानेच कापसाला अनुदानातून वगळले. याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी शासनापर्यंत पाेहाेचवण्याचे अाश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी सुटका करून घेण्याचे प्रयत्न केले. मात्र या वेळी एकच गर्दी झाली. त्यामुळे काँग्रेसच्या घेरावाचा प्रयत्न सफल झाला. पालकमंत्र्यांना या गर्दीतून मार्ग काढणे कठीण झाले हाेते.

दुसरे गेट उघडल्याने अाश्चर्य
जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुसरे गेट बंदच असते. वारंवार हाेणारी अांदाेलने अांदाेलकांच्या त्रासामुळे याच रांगेतील दाेन्ही गेट बंद करण्यात अाली. मात्र, साेमवारी ही दाेन्ही गेट उघडलेली हाेती. हे पाहूनच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना धक्का बसत हाेता. मुळात पालकमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी गेट उघडण्याची खेळी झाली. मात्र त्याचा नागरिकांनीच उपयाेग करून घेतला.

सव्वा तास उशीर
नियाेजन समितीच्या सभेला एक, दाेन मिनिट नव्हे तर चक्क सव्वा तास उशीर झाला. काँग्रेसच्या घेरावात अडकल्यामुळे पालकमंत्र्यांना तिथून निघणे कठीण झाले हाेते. त्यापूर्वीच ते उशिरा अाले. भुसे यांनी सभागृहात शिरल्यानंतर तातडीने सभा सुरू केली.

पायी अाले कार्यालयात
गेटवरच कांॅग्रेसच्या अांदाेलकांनी घेराव घातल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अामदार जयकुमार रावल हे माजी अामदार शरद पाटील अामदार कुणाल पाटील यांच्यासाेबत पायी चालत िजल्हाधिकारी कार्यालयात अाले. पालकमंत्री पहिल्यांदाच पायी चालत अाल्यामुळे पाेलिस यंत्रणेची एकच तारांबळ उडाली.

भूमिका समजून घेऊ
^युती सरकारने शेतकरी हिताच्या बहुतांश याेजना राबवल्या. शासनाने शेतकऱ्यांची कुठलीही साथ साेडलेली नाही. त्यांचेच हे सरकार अाहे. कापसाच्या अनुदानाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला जाईल. त्यावर मंत्रिमंडळात याेग्य ताे निर्णय हाेईल. दादा भुसे, पालकमंत्री

शासनाकडे मुद्दा मांडावा
^कापसाच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र अाहेत, हे दर्शवून देण्याचे काम कांॅग्रेसने केले. मुळात पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न नव्हता; परंतु कांॅग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या तीव्र हाेत्या की, घेराव घडला. अाता शासनाकडे तरी शेतकऱ्यांची बाजू मांडून धरावी. श्यामकांत सनेर, कांॅग्रेसिजल्हाध्यक्ष