आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडा शिकवण्यासाठी काँग्रेस मैदानात, भाजपशी चर्चा फिस्कटली; शिवसेनेनेही दिला उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देताना आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसला राष्ट्रवादीकडून साधी विचारणाही झालेली नाही. तसेच लोकसभेत प्रामाणिकपणे काम करूनही प्रत्येक वेळी मिळणार्‍या अपमानास्पद वागणुकीचा कित्ता गिरवणे राष्ट्रवादीने सुरूच ठेवल्यामुळे कॉँग्रेसने विधान परिषदेसाठी स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाला धडा शिकवण्यासाठी कॉँग्रेसतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आघाडीच्या जागावाटपात जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही व विधानसभेच्या पाच जागांपाठोपाठ विधान परिषदेची जागाही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. आघाडी असल्याने विधान परिषदेचा उमेदवार देताना राष्ट्रवादीने कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍या ंना विश्वासात घेणे अपेक्षित होते. याबाबत भाजप-शिवसेनेत चर्चेच्या औपचारिक फेर्‍या सुरू असताना राष्ट्रवादीनेही विश्वासात घेण्याची अपेक्षा कॉँग्रेसजन बाळगून होते.
मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत कॉँग्रेसला साधी विचारणाही झाली नाही. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अशा प्रकारे जाणीवपूर्वक डावलले जात असल्याने विधान परिषदेत स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठाम निश्चय कॉँग्रेसने केला आहे. हा पक्षाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने वरिष्ठांकडून दबाव येऊ नये यासाठी काही पदाधिकार्‍या ंनी श्रेष्ठींशी चर्चाही केली आहे.

नगरपालिका व जिल्हा परिषदेत पक्षाचे मतदार असल्याने ही निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर मित्रपक्षाला धडा शिकवण्यासाठी कॉँग्रेस मैदानात कायम राहणार असल्याचे संकेत पदाधिकार्‍यानी दिले आहेत. त्यामुळे भगतसिंग पाटील, हरीश् गनवाणी व शुभांगी पाटील या तीन उमेदवारांनी त्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला
४विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे कॉँगे्रसने उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. उमेदवार आमचा असल्याने त्यांच्याशी बोलण्याची गरज वाटली नाही; परंतु कॉँग्रेस आमच्यासोबतच आहे. गरज भासल्यास त्यांच्या पदाधिकार्‍या ंशी यासंदर्भात बोलू.
ईश्वरलाल जैन, खासदार उमेदवार कायम ठेवणार
४ राष्ट्रवादीने उमेदवार देताना विश्वासात घेतले नाही. लोकसभेत प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून अविश्वास दाखवला जात असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या भावना तीव्र बनल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीबाबत कोणाशीही राष्ट्रवादीकडून संपर्क साधण्यात आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवणार असून, या वेळी माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अ‍ॅड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कॉँग्रेस कमिटीअजित पवारांच्या फोनची प्रतीक्षा
अजित पवार हे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांना फोन करून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाध्यक्ष सोमवारी पक्ष कार्यालयात बसून सायंकाळपर्यंत पवारांच्या फोनची प्रतीक्षा करीत होते; परंतु रात्री पक्षाकडून करण पाटील (पवार) यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसेच पक्षाचा एबी फॉर्मही पालकमंत्र्यांकडे देण्यात आला. मंगळवारी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याकडे औपचारिक बैठक होऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली व दुपारी तीन वाजता अर्ज दाखल करण्यात आला. जिल्हाध्यक्ष मात्र या सर्व प्रक्रियेपासून अलिप्त होते; ते कोठेही दिसले नाहीत.

उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर सुटणार जळगाव विधान परिषदेच्या जागेचा तिढा!
विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली चर्चा फिस्कटली. मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबत तोडगा न निघाल्याने शिवसेनेने माजी आमदार कैलास पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी दुपारी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दरम्यान, विधान परिषदेची जागा आमची असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. यासंदर्भात बुधवारी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी कायम ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

भाजप आणि शिवसेनेत विधान परिषदेच्या जागेवरून वाद निर्माण झाला असून, दोघांनी या जागेवर दावा केला आहे. त्यावर स्थानिक पातळीवर तोडगा निघू शकलेला नाही. शिवसेनेचा उमेदवार देण्यासंदर्भातील सकारात्मक बैठकीचे निमंत्रण देणार्‍या भाजपने बैठकीपूर्वीच डॉ.गुरुमुख जगवाणी यांचा उमेदवार अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे, त्यासाठी असलेले सर्वच सूचक मनसेचे होते. ही बाब जिव्हारी लागल्याने भाजप-सेनेतील संबंध आणखीच ताणले गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर मंगळवारी दुपारी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, डॉ.गुरुमुख जगवाणी, डॉ.राजेंद्र फडके, उदय वाघ, अनिल चौधरी, तर शिवसेनेतर्फे माजी आमदार गुलाबराव पाटील, किशोर पाटील, कैलास पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, इंदिरा पाटील उपस्थित होते. या बैठकीत उमेदवारीबाबत तोडगा न निघाल्यामुळे शिवसेनेतर्फे कैलास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नसला तरी, याबाबत उद्घव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अपक्ष लढणार असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.