आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीच रचले मारहाणीचे कारस्थान, अविनाश भालेराव यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अँड.सलीम पटेल यांना झालेली मारहाण पूर्वनियोजित आहे. जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनीच ती घडवून आणली आहे, असा आरोप सरचिटणीस अविनाश भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहेत.


शहराध्यक्ष म्हणून धुरा सांभाळताना सलीम पटेल यांनी कॉँग्रेसची संघटनात्मक बांधणी केली. पक्षासाठी वातावरण पोषक असताना त्याचे श्रेय पटेल यांना जाऊ नये,यासाठी हे कटकारस्थान रचले. पक्षाने उदय पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

रूपनवार चौकशी करणार
कॉँग्रेस भवनातील प्रकाराबद्दल प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी निरीक्षक अँड.रामहरी रूपनवार व आमदार शरद रणपिसे यांची चौकशी समिती स्थापन केली.