आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापडणीस यांच्यांविरोधात काँग्रेसची अवमान याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील महामार्गाला लागून असलेल्या समांतर रस्त्याच्या विकासासंदर्भात खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रानुसार काम केल्याप्रकरणी महापालिका अायुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल केल्याची माहिती डाॅ. राधेश्याम चाैधरींनी पत्रकार परिषदेत दिली. या याचिकेवर २१ जून राेजी सुनावणी हाेणार अाहे. बदलीचे अादेश हाती अाल्यानंतर जाता जाता अायुक्त या नात्याने संजय कापडणीस यांना काँग्रेसने धक्का दिला अाहे.

महामार्गावरील दरराेजच्या अपघातामुळे सन २०१० मध्ये अाैरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात अाली हाेती. यात तत्कालीन अायुक्त प्रकाश बाेखड यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून सन २०१२-१३ या वर्षात समांतर रस्त्यांसाठी ११ काेटींची तरतूद केल्याचे नमूद केले हाेते. त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये १२ काेटी तर सन २०१४-१५ मध्ये २२ काेटींची तरतूद करण्यात अाली हाेती. समांतर रस्त्यांचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे अाश्वासन दिले अाले हाेते. परंतु त्यानंतरही काहीही काम केल्याने काँग्रेसतर्फे शहर कार्याध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी यांनी वारंवार अाठवण करून देत निवेदनही सादर केले. त्यात नाेव्हेंबर २०१५ राेजी एक महिन्याची मुदत देण्यात अाली. परंतु मुदत संपल्यानंतरही काहीही हालचाली केल्या नाहीत. ही जनभावनांशी प्रतारणा असून कर्तव्यात कसूर केल्याने काँग्रेसच्या वतीने अायुक्तांविरुद्ध थेट याचिकास्त्र उपसले गेले.

काँग्रेसचा लढा सुरूच राहणार
महापालिकाप्रशासनाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अवमान केला अाहे. हा प्रकार जाणूनबुजून उल्लंघन केल्याचे जाणवते. जळगावकरांना वेठीस धरले जात असून त्यामुळेच अवमान याचिका दाखल केल्याचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी सांगितले.
समांतर रस्त्यासाठी ‘नही’चा काेणताही अडथळा नसताना पालिकेने साधे सर्वेक्षण केले नाही. तसेच एक पैसाही खर्च केला नसल्याने हा निर्णय घेतल्याचे डाॅ.चाैधरींनी सांगितले. या वेळी पत्रकार परिषदेत मनोज चौधरी, कफील शेख, अमजद पठाण उपस्थित होते.

अामदार भाेळेही रडारवर
अामदारसुरेश भाेळे यांनीही विधानसभा निवडणुकीत ११ कलमी कार्यक्रम जाहीर केला हाेता. त्यात समांतर रस्त्यांचाही मुद्दा मांडला अाहे. दाेन वर्षात अामदारांनी समांतर रस्त्यांसाठी काहीही केलेले नाही. मतांसाठी खाेटे अाश्वासन दिल्याचा अाराेप डाॅ. चाैधरींनी केला. कायदेशीर अभ्यासानंतर अामदार भाेळेंविरुद्ध ही न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला.