आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोद्याच्या संस्थानिकाचा काँग्रेसविरोधात बंडाचा झेंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही कॉँग्रेसचे तिकीट न मिळालेले बडोद्याचे संस्थानिक व माजी खासदार सत्यजित गायकवाड यांनी धुळे मतदारसंघात बंडखोरी करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, गायकवाड अपक्ष लढण्याच्या तयारीत असताना समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. 2009 मध्ये गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बडोद्यातून लोकसभा लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

धुळे मतदारसंघातून कॉँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास गायकवाड इच्छुक होते, मात्र पक्षाने या ठिकाणाहून आमदार अमरीश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ‘काँग्रेसने पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी शब्द दिला होता, मात्र तो न पाळल्यामुळे आता आपण कॉँग्रेसविरोधात निवडणूक लढविणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, आपले मूळ घराणे मालेगाव तालुक्यातील कवळाणेचे. तेथे आमच्या पणजोबांचा राजवाडा आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी नेहमीच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेला चालना दिली आहे. धुळ्यातील काही विधानसभा मतदारसंघांत आपला जनसंपर्क आहे. येथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मी भेटत असतो. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे.’

धुळे व मालेगाव परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सपाचे नेते अबू आझमी येथून लोकसभा लढविणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी त्यांनी गेली काही दिवस चाचपणी केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र काही आठवड्यापूर्वी आझमी यांनी मालेगाव येथे सत्यजित गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती.