आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Party State Incharge Slapped In Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस राज्य प्रभारींच्या श्रीमुखात भडकावली, जळगावात पक्षाच्याच उमेदवाराचा ‘प्रताप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी अ‍ॅड. रामहरी रुपनवार यांना बुधवारी पक्षाच्याच एका उमेदवाराने कॉलर पकडून मारहाण केली.


सायंकाळी रामेश्वर कॉलनीत सभा सुरू होती. रुपनवार व्यासपीठाच्या एका कोप-यावर बसलेले होते. यावेळी काँग्रेसचे उमदेवार विवेक ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन अ‍ॅड. रुपनवार यांच्या कानशिलात लगावली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. काही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना व्यासपीठाखाली खेचून दूर नेले. मात्र ठाकरे पुन्हा धावून येण्याचा प्रयत्न करीत होते. या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांनाही मारहाण केली.


जिल्हाध्यक्षांना शिवीगाळ
अ‍ॅड. रुपनवार म्हणाले की, ठाकरे अंगावर धाऊन आले. जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनाही शिव्या दिल्या. मला सभांना का बोलवित नाही. माझ्या समाजातील मतदारांच्या जोरावर दुस-या प्रभागातूनही तुमचे उमेदवार मी पाडू शकतो, अशी धमकी त्याने मला दिली. मी निवडणुकीतून माघार घेतो, असे ते बोलले. दरम्यान, ठाकरे यांनी मात्र असे काही घडलेच नसल्याचे सांगितले.