आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress , Rashtrawadi All Option Open For Election

निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व पर्याय खुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - बाजारसमितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केली आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याशविाय त्यांना पर्याय नाही. हे पुन्हा एकदा जिल्हा परिषद नविडणुकीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता या आघाडीसाठी पुढाकार कोण घेतो? याकडे लक्ष लागून आहे.

बाजार समिती नविडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय हालचाली, भेटीगाठींना वेग आला आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शेवटची मुदत १६ रोजी आहे. २० रोजी छाननी, यादी प्रसिद्धी २१ जुलै, २७ जुलै अखेर अपील, ऑगस्ट रोजी अपिलावर निर्णय, ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्धी, ऑगस्ट माघार, ऑगस्ट चिन्ह वाटप, ३० ऑगस्ट मतदान सकाळी ते वाजेदरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मतमोजणी. असा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे १० दविस उमेदवारी दाखल करण्यास बाकी आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

...तर नविडणूक स्वबळावर लढणार
सोमवारी काँग्रेसच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काँग्रेसने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाटाघाटी करण्यास ज्याला यायचे असेल त्यांनी यावे अन्यथा नविडणूक स्वबळावर लढू, अशी माहिती शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. तालुकाध्यक्ष डॉ.अनिल शिंदे हे बैठकीला जळगाव येथे गेल्याने स्थानिक बैठकीतील माहिती पाटील यांनी दिली.

पदाधिकारीचर्चेसाठी आमंत्रणाची बघताहेत वाट
समविचारीमित्र पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय माजी आमदार साहेबराव पाटील तालुकाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी घेतला आहे. याबाबत वाटाघाटी करून यश आले तर आम्हीही आघाडी करण्यास तयार आहोत, अशी माहिती दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी चर्चेसाठी एकमेकांचे आमंत्रण देण्याची वाट पाहत आहेत.
जिल्हा परिषद पराभवापासून धडा
जिल्हापरिषद नविडणुकीत राष्ट्रवादीचे घटलेले मतदान, यात काँग्रेसची झालेली दाणादाण, यामुळे आघाडी केली तरच टिकाव लागेल, असा सूर सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अन्यथा कार्यकर्त्यांचा बळीचा बकरा बाजार समितीत होईल. हे पण सामान्य कार्यकर्ते जाणून आहेत.

आमदारांच्याभूमिकेकडे लक्ष
यानविडणुकीत आमदार शिरीष चौधरी हे काँग्रेस सोबत नविडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मनोज पाटील यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस अखेरच्या क्षणी ही भूमिका घेऊ शकते नविडणुकीत रंगत येऊ शकते.