आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसचे सहा मिनिटांचे अांदाेलन पाेलिसांनी घेतले सहजपणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अांदाेलने अंगवळणी पडलेल्या कॉंग्रेसने साेमवारी केलेल्या रास्ता राेकाे अांदाेलनाची रंगीत तालिम पाेलिस यंत्रणेनेही सहजतेने घेतली. अवघ्या सहा मिनिटात अाटाेपलेले अांदाेलन रास्ता राेकाेएेवजी सिग्नल राेकाे ठरले.
हे अांदाेलन हाताळण्यासाठी अजिंठा चाैफुलीवर तगडा पाेलिस बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता. कार्यकर्त्यांना धरपकड करणे, गुन्हा नाेंदवणे अाणि अटक करण्याच्या तयारीत असलेल्या पाेलिसांनी प्रत्यक्षात अांदाेलन एन्जाॅय केले. पदाधिकाऱ्यांची फाेटाेसेशनची धडपड पाहून पाेलिसांनी अटक केलेेले कार्यकर्तेदेखील त्यांच्या वाहनातून उतरवून दिले.
राज्यभरात नियाेजित असलेले कांॅग्रेसच अांदाेलन यशस्वी करण्यासाठी जळगावच्या प्रभारी डाॅ.हेमलता पाटील साेमवारी खास नाशिक येथून अाल्या हाेत्या. अजिंठा चाैफुलीवर दुपारी १.४५ वाजेपासून कडक इस्त्रीमधील कांॅग्रेस पदाधिकाऱ्यांचे अागमन सुरू झाले. २.३० वाजेपर्यंत वेगवेगळ्या तालुक्यांमधून पदाधिकारी दाखल झाले. २.३० वाजता पदाधिकारी महिंद्रा हाॅटेल समाेरून महामार्गावरील एका सिग्नलसमाेर चालत गेले. रस्त्यावर घाेळका करून सर्वांनीच घाेषणाबाजी केली. महिंद्रा हाॅटेलसमाेरील सिग्नलच्या अाेट्यावर उभ्या असलेल्या माध्यमांच्या छायाचित्रकारांकडे काही पदाधिकारी फाेटाे काढण्यासाठी पुढे सरसावले. फाेटाे सेशनमध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेत रास्ता राेकाे अांदाेलन सिग्नल राेकाे झाले.

अवघे सहा मिनिटे फाेटाे सेशन सुरू हाेते. तेवढ्या काळात अांदाेलनाला वळसा घालून वाहतूक सुखरूप सुरू हाेती. २.३६ वाजता अांदाेलन थांबले. पाेलिसांनी अावाहन करताच कार्यकर्ते व्या मिनिटाला पाेलिसांच्या गाडीत जाऊन बसले. तेथेही प्रथमच अांदाेलनात सहभागी झालेल्या हाैसी पदाधिकारी, कार्यकर्ते अापल्या माेबाइलमध्ये अांदाेलनाचा फाेटाे काढून घेण्यासाठी धडपडत हाेते. पाेलिसांनी त्यांना फाेटाेसेशनसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
अॅड.संदीप पाटील, डाॅ.हेमलता पाटील, डाॅ.अर्जुन भंगाळे, डाॅ.राधेश्याम चाैधरी, डी.जी. पाटील, अविनाश भालेराव, पराग पाटील, राजू सवर्णे, देवेंद्रसिंग पाटील, राजस काेतवाल, परवेज पठाण, देवेंद्र मराठे, युवराज साेनवणे, याेगेंद्रसिंग पाटील, प्रभाकर साेनवणे अादींसह अनेक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते. दरम्यान, अांदाेलन अंगवळणी पाडण्यासाठी कांॅग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असल्याचे पाहून िजल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

अजिंठा चाैफुलीवर काँग्रेसने रास्ता राेकाे अांदाेलन केले. दुसरीकडे पदाधिकारी माेबाइलमध्ये फाेटाे काढण्यात गुंतले हाेते. पालकमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विराेधात असताना कापूस, पेट्राेल या विषयावर अांदाेलन छेडले हाेते. प्रत्यक्षात ते सत्तेवर अाले असताना त्यांनी कापूस दरवाढीच्या मुद्यावर चुप्पी साधली अाहे.या विराेधात काँग्रेसने अांदाेलन छेडले अाहे. अॅड.संदीपपाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
मंत्र्यांनी का साधली चुप्पी
अांदाेलना दरम्यानपाेलिसांच्या अावाहनानुसार काही पदाधिकारी अाणि कार्यकर्ते पाेलिसांच्या व्हॅनमध्ये जाऊन बसले. त्यांना अटक करणे अाणि पाेलिस ठाण्यात जाऊन सुटका करून देणे, असे अपेक्षित हाेते. मात्र, काँग्रेसच्या अांदाेलनामुळे वाहतूक ठप्प झाली नाही अाणि सुरू हाेण्यापूर्वीच अांदाेलन संपल्यामुळे समाधान व्यक्त करत पाेलिसांनी त्यांच्या गाडीत बसलेले कार्यकर्ते उतरवून दिले अाणि अटक करून घेऊन जाण्यास नकार दिला.

तडगा बंदाेबस्त
अजिंठाचाैफुली हा प्रमुख मार्ग असल्याने ट्रॅफिक जाम हाेऊ नये, यासाठी दुपारी वाजेपासून तेथे वाहतूक शाखेसह इतर पाेलिसांनी बंदाेबस्त लावला हाेता. कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी चार ते पाच गाड्या मागवण्यात अाल्या हाेत्या. अांदाेलन चिघळू नये, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी पाेलिसांनी विशेष बंदाेबस्त लावला हाेता. चारही रस्त्यांवर बॅरिकेट‌्स लावण्यात अाले हाेते. पाेलिस अधिकारी स्वत: उपस्थित हाेते.