आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस महिला आघाडीचे पदाधिकारी बदलणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- काँग्रेस पक्षात जिल्हापातळीवर संघटनात्मक बदल करण्याच्या दृष्टीने महिला अाघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी शनिवारी काँग्रेस भवनात संघटनात्मक आढावा घेतला. या वेळी महिला अाघाडीचे जिल्हाध्यक्ष अाणि महानगराध्यक्ष यांना बदलून नवीन पदाधिकारी देण्यासंदर्भात त्यांनी काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही महिला पदाधिकाऱ्यांना त्यांनी काम करण्यासंदर्भात समजही दिली.
गेल्या वर्षभरात पार पडलेल्या विविध निवडणुकीत काँग्रेस महिला अाघाडीचे स्थानिक पातळीवर काम दिसले नाही, महिला पदाधिकारी अाणि कार्यकर्त्यांचा सहभागही फारसा नव्हता, या बाबींची नाेंद घेत प्रदेशाध्यक्षांनी शनिवारी िजल्हा दाैरा केला. या वेळी महिला पदाधिकारी अाणि कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. सत्ता गेल्यानंतर काँग्रेसने अाक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरण्याची तयारी केली अाहे. त्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर देण्यात अाला अाहे. महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी जळगाव िजल्हा महिला संघटनेच्या दाेन्ही महिला पदाधिकाऱ्यांना बदलण्याचे संकेत दिले अाहेत. नवे पदाधिकारी म्हणून काेणाची नियुक्ती करावी? यासंदर्भात त्यांनी िजल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत जिल्हा परिषद सदस्या पुष्पा तायडे, प्रा. माया शिंदे यांची नावे अाघाडीवर असल्याची माहिती मिळाली.
महिलांचा मेळावा
बैठकीनिमित्तप्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस भवनात महिला मेळाव्याला मार्गदर्शन केले. या वेळी िजल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महानगराध्यक्ष डाॅ. ए. जी. भंगाळे, डाॅ. राधेश्याम चाैधरी, िजल्हा परिषद सदस्या पुष्पा तायडे, प्रा. माया शिंदे, सुवर्णा माेरे, मनीषा चव्हाण उपस्थित हाेते. माजी अामदार शिरीष चाैधरी, डी. जी. पाटील यांनी व्यवहारे यांची भेट घेतली.
कांॅग्रेस भवनात अायाेजित महिला मेळाव्यात बाेलताना िजल्हा परिषद सदस्या पुष्पा तायडे. व्यासपीठावर उपस्थित महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, िजल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, डाॅ. ए. जी. भंगाळे अादी.