आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Won Zilha Parishad In Dhule And Nandurbar

धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राज्यातील धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेसने वर्चस्व गाजवले, तर अकोला जिल्हा परिषदेत भारिप-बहुजन महासंघाने बाजी मारली आहे. शिवसेनेचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. धुळ्यात शिवसेनेला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल. कॉँग्रेसला 56 पैकी 30, तर त्याखालोखाल भाजपला 13 जागांवर, राष्‍ट्रवादीला 7, तर अपक्षांना 4 जागांवर विजय मिळाला आहे.
नंदुरबारमध्ये सत्तांतर : जिल्हा परिषदेत राष्‍ट्रवादीला शह देत काँग्रेसने 56 पैकी 29 जागी विजय मिळवून सत्ता काबीज केली. राष्‍ट्रवादीला 25 जागा, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. गेल्या वेळी राष्‍ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी करत 35 जागा मिळवल्या होत्या.
अकोल्यात काँग्रेसची पीछेहाट : अकोल्यात 53 जागांपैकी भारिप बहुजन महासंघाने आघाडी घेत 23 जागी विजय मिळवला. येथे शिवसेनेला 8, भाजपला 11, काँग्रेसला 5, राष्‍ट्रवादीला 2, तर अपक्षांना 4 जागांवर विजय मिळाला.