आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरातील बहुतांश एटीएम बंद; रणरणत्या उन्हात नागरिकांची भटकंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील बहुतांश एटीएम शनिवारी बंद हाेते. काहींमध्ये बॅलेन्स नव्हता. तर काही ठिकाणी सर्व्हर कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे शहरात भरउन्हात नागरिकांना पैसे काढण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण भटकावे लागले. तसेच शनिवारी अर्धा दिवसच बंॅकांची कामे सुरू असल्यामुळे खात्यातून थेट पैसेदेखील काढता अाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
महिन्याचा शुभारंभ, लग्नसराईची धामधूम अन् बाजारपेठेचा दिवस असा एकत्र याेग शनिवारी अाला. त्यात मेची सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी बंॅका बंद हाेत्या. त्यामुळे एटीएममधील राेकड कमी झाली हाेती. शनिवारी माेठा विवाह मुहूर्त हाेता. त्यामुळे शहरात जिल्हाभरातून माेठ्या संख्येने नागरिक अाले हाेते. त्यासाेबतच शनिवारी जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक हाेती. या सगळ्यांना एटीएम बंदचा फटका बसला. पैसे काढता अाल्याने अनेकांचे व्यवहार झाले नाहीत. नागरिकांना खरेदी करता अाले नाही.
हे एटीएम हाेते बंद
अायडीबीअायबँकेचे खान्देश काॅम्प्लेक्समधील शाखेचे स्वातंत्र्य चाैकातील एटीएम नादुरुस्त असल्याने बंद हाेते. नाथ प्लाझातील स्टेट बॅंकेचे एटीएम बंद हाेते. विसनजीनगरातील बँक अाॅफ बडाेदाचे एटीएम दुरुस्तीसाठी बंद अाहे. एम.जे काॅलेज परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम नादुरुस्त असल्याने बंद हाेते. नवीपेठेतील युनियन बँकचे सेंट्रल बँकेच्या एटीएमला कनेक्टीव्हिटी मिळत नव्हती. तिच स्थिती एम. जे. काॅलेज परिसरातील अॅक्सिस बंॅकेच्या एटीएमचीही हाेती.

लग्नाच्या अानंदावर विरजण

जवळच्या नातेवाइकांच्या लग्नासाठी अालाे हाेताे. लग्नासाठी मुलांना कपडे खरेदी करणार हाेताे. मात्र, शहरातील अनेक बंॅकांच्या एटीएममध्ये जाऊनही पैसे निघू शकल्याने मुलांची माेठी निराशा झाली. सुनीलगायकवाड, जामनेर