आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, प्रा.पडघन यांचे परखड मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या ओघात संविधानाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने डोळसपणे संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे परखड मत प्रा.अजय पडघन यांनी मांडले.
संत गजानन महाराजनगरातील कोळी समाज मंगल कार्यालयात बहुजन जागृती मंचतर्फे आयोजित संविधान जनजागृती परिषदेत ते रविवारी बोलत होते. दुपारी १२ ते या कालावधीत झालेल्या परिषदेचे उद्घाटन यावलचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे यांच्या हस्ते झाले. प्रत्येकाने डोळसपणे संविधानाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक अाहे. देश खऱ्या अर्थाने अद्यापही स्वतंत्र झालेला नाही. प्रत्येक बाबतीत आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे संविधानाच्या तंतोतंत अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. राज्यघटनेने आपल्याला दिलेले हक्क जाणून घेताना प्रत्येकाने कर्तव्यांचादेखील विचार करणे गरजेचे आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू अाहेत. या बाबींचा सर्वांनी बारकाईने अभ्यास करावा, असे प्रा.पडघन यांनी सांगितले. निवृत्त गटविकास अधिकारी डाॅ.आर.पी.तायडे, डॉ.डिगंबर खोब्रागडे, टी.एम.खोब्रागडे, मनोजकुमार जैन, शिक्षणविस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, किशोर वानखेडे, आर.आर.महाजन, राजश्री सपकाळे, अरुण धनपाल, मंडळाधिकारी शशिकांत इंगळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश फेगडे, गजानन नारखेडे, रवींद्र कोळी, एम.झेड. पडवेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र मेढे यांनी केले. आभार विलास तायडे यांनी मानले.

सत्तेत स्थान नाही
मार्गदर्शन करताना रवींद्र कोळी यांनी आरक्षणाची सविस्तर माहिती दिली. गोरगरिबांना राजसत्तेत स्थान मिळावे यासाठी आरक्षण आहे. मात्र, त्यांना सत्तेत स्थान मिळाले नसल्याने भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

समता, बंधुत्व घटनेचा पाया
घटनेचामूलभूत पाया समता, बंधुत्व आणि समानतेवर आधारित असून, घटनेचा सर्वांनी अभ्यास करणे अावश्यक आहे. शिवाय ‘स्वातंत्र्य, कर्तव्ये आणि हक्क’ या विषयावर समानता असणे गरजेचे आहे, असे मत वरणगाव अायुध निर्माणीचे कार्यप्रबंधक एम.झेड.पडवेकर यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...