आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभागाच्या २२० कामांचा श्रीगणेशा कधी होणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील मंजूर विविध ६९० कामांपैकी २२० कामांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. यावरून बांधकाम समितीच्या सभेत उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सभा शुक्रवारी सभापती अन‌् उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यात बांधकाम विभागातील उपअभियंत्यांच्या कामाबाबत सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एप्रिल २०१४पासून आजतागायत जिल्ह्यात ६९० कामांना मंजुरी देण्यात आली अाहे. त्यापैकी ३३७ कामे पूर्ण झाली असून १३९ कामे सुरू आहेत तर २२० कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. एकीकडे निधी नसल्यामुळे कामे होत नसल्याची ओरड केली जाते, तर दुसरीकडे निधी आणि वर्कऑर्डर दिलेली असतानाही कामे होत नाहीत. उपअभियंत्यांच्या कार्यपद्धतीबाबत सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. मार्चपूर्वी ही कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचे आदेश आमले यांनी संबंधितांना दिले अाहेत. ही कामे चाळीसगाव, जळगाव, एरंडोल, रावेर, भुसावळ मुक्ताईनगर या तालुक्यातील आहेत. त्याचवेळी जामनेर अमळनेर या तालुक्यातील कामांचा आढावा प्राप्त झाला नसल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या वेळी सांगितले.