आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारसे कॉलनीत दूषित पाणीपुरवठा, पाण्यात अळ्या आढळयाने नागरिक संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात सध्या दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाजीनगर परिसरातील बारसे कॉलनीतही मंगळवारी दूषित पाणीपुरवठा झाला. या पाण्यात अळ्याही आढळून आल्याने पिण्‍यासाठी कोणते पाणी वापरावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बारसे कॉलनी, आर. वाय. पार्क कॉलनी या परिसरात मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात गटारीचे गढूळ पाणी, पिवळे पाणी तसेच अळ्या असलेल्या पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे बराच वेळ पाणी वाया घालवावे लागले. या परिसरात पाइपलाइन गटारीतून गेली आहे. पाइपलाइनला गळती असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली, त्यामुळेच दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा होत असल्याचे रावण ठाकरे यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा होतो, मात्र दूषित पाण्यामुळे ते साठवणे शक्य नाही. त्यामुळे चांगल्या पाण्याचा पुरवठा होईल; या प्रतीक्षेत खराब पाणी वाया जाते, अशीही खंत व्यक्त करण्यात आली.