आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरगव्हाणला दूषित पाणीपुरवठा; १७२ जणांना अतिसाराची लागण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धानाेरा - जलवाहिन्यांच्या गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याने चाेपडा तालुक्यातील वरगव्हाणला अतिसाराची लागण झाली. पाेटात दुखणे, जुलाब उलट्यांचा त्रास १७२ जणांना झाला. त्यांच्यावर शनिवारी (दि. २७) गावात कॅम्प लावून उपचार करण्यात अाले. 
वरगव्हाण परिसरात २४ मे राेजी पाऊस झाला हाेता. पावसाचे पाणी मुख्य चाैकातील कूपनलिकेजवळ साचले. तसेच फुटलेल्या जलवाहिनीतही हे पाणी शिरले. त्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा झाला. हेच पाणी प्यायल्याने १७२ नागरिकांना शनिवारी पाेटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास झाला. ज्यांना अधिक त्रास झाला ते रुग्ण धानाेरा येथील अाराेग्य केंद्रात गेले. त्यानंतर धानाेरा प्राथमिक अाराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अजित वाडेकर, अाराेग्य सेवक, जे.वाय.पाटील, बी.एस. साेनवणे, भिकुबाई बाेदडे यांनी धाव घेऊन वरगव्हाण गाठले. ग्रामपंचायत कार्यालयातच रुग्णांवर शनिवारी रात्री वाजेपर्यंत उपचार केले. जिल्हा परिषदेचे अाराेग्य सभापती दिलीप पाटील, चंद्रशेखर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ते रात्री दाेन वाजेपर्यंत ठाण मांडून हाेते. 

वैद्यकीय पथकात २२ कर्मचारी 
अतिसाराचीलागण झालेल्या रुग्णांची संख्या रविवारी वाढत असल्याचे समाेर अाले. दक्षता म्हणून त्यांच्यावर उपचारासाठी मराठी शाळेत कॅम्प लावण्यात अाला अाहे. प्रभारी जिल्हा अाराेग्य अधिकारी डाॅ.बी.अार. पाटील, चाेपडा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश लाेमटे यांच्यासह अन्य पाच वैद्यकीय अधिकारी २२ कर्मचाऱ्यांचे पथक गावात तळ ठाेकून अाहे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची पाहणी अाराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. दूषित पाणीपुरवठ्याचे कारण ठरलेले नादुरुस्त व्हाॅल्व्हची दुरुस्ती करण्यात अाली. गटविकास अधिकारी ए.जे. तडवी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रकाश लाेमटे यांनी रुग्णांच्या घरी भेटी देऊन विचारपूस केली. परंतु, या वेळी सरपंच, उपसरपंच उपस्थित नव्हते. तसेच चाेपडा उपजिल्हा रुग्णालयात १० रुग्णांना उपचारासाठी दाखल केले अाहे. 

पाण्याचे नमुने घेतले 
गावात हाेणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नमुने घेण्यात अाले अाहेत. तपासणीसाठी ते पाठवण्यात येतील, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रकाश लाेमटे यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर. पाटील, वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील, गटविकास अधिकारी ए.जे. डवी, विस्तार अधिकारी एस.बी.कोळी, प्रभारी ग्रामसेवक एम.एल.चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लोमटे, डॉ.अजित वाडेकर, डॉ,नीलिमा देशमुख, डॉ. सचिन ठाकूर, डॉ. रमाकांत सोनवणे यांच्यासह २२ कर्मचाऱ्यांचे पथक गावात तैनात करण्यात अाले अाहे. 
अतिसाराच्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय उपचारासंदर्भात सल्ला देताना डाॅ. प्रकाश लाेमटे. 

वरगव्हाणच्या प्राथमिक शाळेतील उपचार कक्षात दाखल महिला. 
^सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवकच अतिसाराची लागण हाेण्यास जबाबदार अाहेत. गावात अस्वच्छतेच्या तक्रारी असून त्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. साफसफाईसाठी याेग्य निर्णय घेतला पाहिजे. रवींद्रपाटील, सदस्य, ग्रामपंचायत, वरगव्हाण 

^गावातील परिस्थितीपुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी अाणखी एक दिवस लागेल. दूषित पाणीपुरवठ्याने साथीची लागण झाली असावी. परिस्थिती नियंत्रणात अाहे. जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना केल्या. डाॅ.बी.अार.पाटील, प्रभारी अाराेग्य अधिकारी
 
^अाराेग्य विभागाने तातडीने रुग्णांवर उपचार केले. अापल्याला माहिती मिळताच डाॅक्टरांचे पथक घेऊन शनिवारी रात्रीच वरगव्हाण येथे दाखल झालाे हाेताेे. अाराेग्य पथक तैनात अाहे. दिलीपपाटील, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद 

 
बातम्या आणखी आहेत...