आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contaminated Water Suply In Takali, Three Hundrads Ill

टाकळीत दूषित पाणीपुरवठा; ३००जणांना अतिसाराची लागण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- टाकळीयेथे तब्बल ३००पेक्षा जास्त रुग्णांना अतिसाराची लागण झाली आहे. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटल्याने गावात दूषित पाणीपुरवठा झाला. त्यामुळे ही लागण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. फुटलेल्या जलवाहिनीकडे पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने िदलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अाहे.

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे वाकी नदीला पूर आल्याने टाकळी गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी वाहून गेली होती. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने १०-१२ दिवसांपूर्वी टाकळी ग्रामपंचायतीला जलवाहिनी जोडून घेण्यासह पाण्यात टीसीएल पावडर टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, टाकळी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नसल्यान सूचनांकडे दुर्लक्ष झाले. शनिवारी रुग्णांची संख्या वाढली परिस्थिती गंभीर असलेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले. टाकळीतही शंभरावर रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र, रविवारी रुग्णांची संख्या वाढून ३००च्या वर गेली. दोन दिवसांत ६००पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. ३००पेक्षा जास्त रुग्णांची गंभीर परिस्थिती पाहता टाकळी येथेच जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य कॅम्प लावण्यात आला अाहे.
रुग्णांना खिचडीचे वाटप
रुग्णांनाशनिवार रविवार असे दोन दिवस जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे कार्यकर्त्यांनी खिचडीचे वाटप केले.

परिस्थिती नियंत्रणात
अतिसाराच्यारुग्णांवर टाकळीसह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या वेळी सात दिवसांसाठी कॅम्प लावण्यात आला. माजी नगराध्यक्षा साधना महाजन, पंचायत समिती सभापती आरती लोखंडे, माजी उपसभापती नवलसिंग पाटील, नगरपालिकेतील विरोधी गटनेते महेंद्र बाविस्कर यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, डॉ.शिवाजी करमकर डॉ.पंकज जाधव यांनी भेट दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पांढरे, डॉ.गौतम खिल्लारे यांच्यासह १० आरोग्यसेवक १० आरोग्यसेविकांचे पथक सेवेसाठी तैनात होते.

मंत्र्यांनी दिली भेट
टाकळीगावात अतिसाराची साथ पसरून ५० ते ६० रुग्णांना शनिवारी रात्री जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली. या वेळी केवळ एक डॉक्टर तीन नर्स उपस्थित असल्याने त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.