आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळ्यात कंटेनरला लागलेल्या आगीत 90 दुचाकी खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा (ता. शिंदखेडा) गावाजवळ मोटारसायकलींची वाहतूक करणा-या कंटेनरला गुरुवारी आग लागून सुमारे 90 हून अधिक दुचाकी खाक झाल्या. या सर्व मोटारसायकली होंडा कंपनीच्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईकडून आग्य्राला जाणा-या कंटेनरमधून होंडा मोटारसायकलींची वाहतूक केली जात होती. नरडा गावाजवळ चालकाने कंटनेर थांबविला. त्यानंतर कंटेनरला अचानक आग लागली. घटनेनंतर चालक पसार झाला. त्यामुळे परिसरातील काही व्यावसायिकांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर धुळे, शिरपूर आणि दोंडाईचा येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले.

तीन बंबांच्या मदतीने सुमारे तासाभराने आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, चालक फरार झाल्याने या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती. त्यामुळे कंटेनर आणि आगीत भस्मसात झालेल्या मोटारसायकलींच्या नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होऊ शकली नाही.