आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्त्रोसोबत करार; २७ जुलै ते ऑगस्टदरम्यान मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सेंट्रलबोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनशी (सीबीएसई) संलग्नित असलेल्या शाळांमधील शिक्षकांना इस्त्रोद्वारे (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) मार्गदर्शन मिळणार आहे. यासाठी सीबीएसई आणि एनसीईआरटी यांनी इस्त्रोसोबत एक करार केला आहे. वदि्यार्थी तसेच शिक्षकांसाठी हे एक चांगले पाऊल ठरणार आहे.

उपक्रमांतर्गत ‘कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम रिमोट सेंसिंग’द्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात सीबीएसईचे भूगोल विषयाच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल. या संदर्भातील एक अधिसूचना सीबीएसईने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार २७ जुलै ते ऑगस्टदरम्यान हे मार्गदर्शन केले जाणार आहे. देशभरातील एकूण १७ केंद्रांवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाच शिक्षकांना संधी दिली जाणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना किंवा शाळांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

टेस्टची माहिती मोबाइलवर
सीबीएसईतर्फे२५ जुलै रोजी होणा-या ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टची (एआयपीएमटी) अपडेट माहिती मोबाइल तसेच ई-मेलवर कळवण्यात येणार आहे. यात परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली जाईल.

उद्यापर्यंत करा अर्ज
याउपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षकांनी १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी http:/goo.gl/forms/b9asvju73f या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर केंद्राच्या क्षमतेनुसार शिक्षकांची नविड केली जाणार आहे. शिक्षकांना भूगोल विषयासंदर्भात सखोल वेगळी माहिती तथा ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

शिक्षक, वदि्यार्थ्यांचा फायदा
इस्त्रोसारख्यासंस्थेकडून भूगोलासंदर्भात माहिती मिळणे ही एक चांगली बाब आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम शिकवत असताना वदि्यार्थ्यांना येणा-या अडचणींसदर्भात शिक्षकांना सखोल माहिती असणे आवश्यक आहे. या मार्गदर्शन वर्गामुळे शिक्षकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. त्याचा फायदा शिक्षकांसह वदि्यार्थ्यांना होणार आहे.