आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Infringement,Latest News In Divya Marathi

अखेर 31 वर्षांनंतर निघाले वादग्रस्त अतिक्रमण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नेहरू चौकालगत असलेल्या सिटी सर्व्हे नंबर 2116मधील खान्देश विव्हिंग मिलच्या आवारात जगन्नाथ वाणी यांनी केलेले अतिक्रमण अखेर काढले. आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करत अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील नेहरू पुतळ्यालगत असलेल्या जगन्नाथ वाणी यांनी केलेले अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने अभियंता जयंत शिरसाठ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. प्रशासन याप्रकरणी गंभीर असल्याचे पाहून संबंधितांनी अतिक्रमण स्वत: काढून घेण्याची तयारी दर्शवली होती. काही दिवस काम केल्यावर संबंधितांनी काम बंद केले होते. तसेच काही दिवस वाट पाहिल्यावर शनिवारी अतिक्रमण विभागाने एक जेसीबी लावत ही कारवाई पूर्ण केली.
1983 मध्ये मंजुरी
या जागेत केलेले अतिक्रमण तीन महिन्यांच्या आत काढून घेण्याच्या अटीवर या ले-आऊटला 29 डिसेंबर 1983 रोजी मंजुरी दिली होती. मात्र, अतिक्रमणधारकांचे सत्ताधा-यांशी असलेल्या जवळीकतेमुळे या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नाही. याप्रकरणी एकनाथ खडसे, या भागातील रहिवाशांच्या तक्रारींचा संदर्भ देऊन बांधकाम पाडण्याचे आदेश आयुक्तांनी 1 जून रोजी दिले होते.