आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत उत्साहासाठी माझ्या नावाचा वापर, दिलीप वळसे-पाटलांवर एकनाथ खडसेंचा प्रहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात अस्तित्वच नाही. अाता हाती दुसरे काहीही नसल्यामुळे कार्यकर्त्यांना प्राेत्साहित करण्यासाठी दिलीप-वळसे पाटील हे माझ्या नावाचा वापर करत असल्याचा टाेला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बाेलताना लगावला. दरम्यान, माझ्यावर बिनबुडाचे अाराेप करणाऱ्या अंजली दमानिया अाणि प्रीती शर्मा-मेनन यांच्यासह इतरांवर १०० काेटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे खडसे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेेसचे नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात अायाेजित पक्षाच्या बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे अाणि गिरीश महाजन यांच्यातील वाद हा त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पुरेसा असल्याचा चिमटा काढला हाेता. त्यावर शुक्रवारी जळगावात असलेल्या खडसे यांनी उत्तर दिले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मानपूर येथील त्यांच्या नावे असलेली जमीन प्रतिज्ञापत्रात दाखवलेली नसल्याचे प्रकरण पुढे येत अाहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता खडसे म्हणाले की, ही जमीन कारखान्याची अाहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या वेळी अाम्हाला जिल्ह्यात इथेनाॅलचा प्रकल्प उभारण्याचा सल्ला दिला हाेता. अाम्ही सर्व संचालकांच्या नावे ही जमीन घेतली हाेती. अाधी वैयक्तिक नावे खरेदी केल्यानंतर जमीन कारखान्याच्या नावे करावे, असे ठरले हाेते. यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलेच अाहे. दरम्यान, अामदार गुलाबराव पाटील यांच्याविराेधातील अब्रुनुकसानीचा दाव्याचा खटलादेखील लवकरच बाेर्डावर येणार अाहे, असेही खडसे म्हणाले.

डिपॉझिट जप्तीची वेळ
माझ्याविराेधात निवडणूक लढवताना काँग्रेस अाणि राष्ट्रवादी या दाेन्ही पक्षांचे उमेदवार एकत्र अाले हाेते. दाेघांवर डिपाॅझिट जप्त हाेण्याची वेळ अाली हाेती. मुक्ताईनगर मतदार संघात या दाेन्ही पक्षांनी माझ्याविराेधात शिवसेनेला जाहीर मदत केली हाेती, असेही खडसे यांनी या वेळी सांगितले.