आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपांच्या ठिणग्या; पुतळे पेटले, खडसे-गुलाबराव वाद विकोपाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देऊन संध्याकाळी ६.१५ वाजता शिवाजी चौकात पालकमंत्री एकनाथ खडसे यांचा पुतळा जाळला. - Divya Marathi
शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देऊन संध्याकाळी ६.१५ वाजता शिवाजी चौकात पालकमंत्री एकनाथ खडसे यांचा पुतळा जाळला.
जळगाव- पालकमंत्री एकनाथ खडसे अाणि शिवसेना अामदार गुलाबराव पाटील यांच्यातील शाब्दिक वाद मंगळवारी उफाळून अाला. आरोप-प्रत्यारोपाच्या ठिणग्यांमुळे पाचाेऱ्यात दुपारी भाजपने अामदार पाटील यांचा तर शिवसेनेने खडसेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. हे लाेण जळगावात पसरल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सरदार ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टाॅवर चाैकात पाटलांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. या अांदाेलनात भाजप कार्यकर्ते घुसले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेदेखील सायंकाळी ६.१५ वाजता शिवतीर्थ मैदानावर खडसेंचा पुतळा जाळला.
जळगावात महानगरच्या मेळाव्यात अामदार गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जाहीरपणे अाराेपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर पालकमंत्री खडसे यांनी मंत्रिपद मिळाल्याने गुलाबरावांचे मानसिक संतुलन ढासळल्याचा टाेला लगावला हाेता. गेल्या महिनाभरापासून भाजप अाणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खडसे-पाटील वादांवर सातत्याने अाराेप-प्रत्याराेपाचे शीतयुद्ध सुरू अाहे. रविवारच्या मेळाव्यानंतर भाजपकडून झालेल्या प्रतिहल्ल्याचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात अाला. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाचाेरा येथे पुतळे जाळपाेळीचे अांदाेलन केले. दुपारनंतर या घटनेचे तातडीने जळगावात पडसाद उमटले.

पाचाेऱ्यातफुटले वादाला ताेंड
महसूलमंत्रीखडसे अामदार पाटील यांच्यातील वादाचे पडसाद पाचाेरा येथे उमटले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी अामदार पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करताच संतप्त शिवसैनिकांनी खडसे यांच्या पुतळ्याचे दहन केले. यामुळे शहरात तणावपूर्व स्थिती निर्माण झाली हाेती. दुपारी भाजपचे सरचिटणीस सदाशिव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख मधुकर काटे, तालुकाप्रमुख सुभाष पाटील, अविनाश पुडे, अंबादास साेमवंशी, पद्मसिंग पाटील, ज्ञानेश्वर चाैधरी, पंढरीनाथ पाटील, जावेद शेख, अरुण तांबे कार्यकर्ते गुलाबराव पाटलांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यासाठी शिवाजी चाैकात पाेहाेचल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागली. त्यामुळे ते तातडीने शिवसेना कार्यालयापासून एकनाथ खडसे यांचा पुतळा साेबत घेऊन शिवाजी चाैकाकडे निघाले. मात्र, त्यापूर्वीच भाजपच्या मंडळींनी अामदार पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले हाेते. ते पाहून शिवसैनिकांनी ‘जशास तसे’ उत्तर दिले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनकर देवरे, तालुकाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शिवशक्ती-भीमशक्ती सेनेचे जिल्हाप्रमुख खंडू साेनवणे यांनी चाैकात खडसे यांच्या पुतळ्याचे दहन केले. या वेळी दाेन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या नेत्यांवर अाराेप प्रत्यारोप केलेत.
चाळीसगावभाजपचे पत्रक
वायफळबडबड बंद करून अामदार गुलाबराव पाटील यांनी विकासकामे मंजुरीकडे लक्ष द्यावे, असा टाेला चाळीसगाव तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला अाहे. पालकमंत्री खडसे यांनी जिल्ह्याचा विकास केला असून, त्यांच्या कामाबद्दल विराेधकही काैतुक करत असल्याचे पत्रकात म्हटले अाहे. या पत्रकावर माजी अामदार प्रा.साहेबराव घाेडे, जिल्हा बँकेचे संचालक वाडीलाल राठाेड, शहराध्यक्ष राजेंद्र चाैधरी, कैलास सूर्यवंशी, मच्छिंद्र राठाेड, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राठाेड अादी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या अाहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पोलीसांनी कसा हाणून पाडला सरदार ब्रिगेडचा प्रयत्न
बातम्या आणखी आहेत...