आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला एन्ट्री, भाजपला रोखले गेटवर, पाेलिसांवर काढला राग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमारतीच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झालेली बाचाबाची. - Divya Marathi
इमारतीच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झालेली बाचाबाची.
धुळे- उमेदवारीअर्ज भरण्यासाठी अालेल्या कांॅग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाहनांसह थेट प्रवेश दिला तर भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र राेखण्यात अाले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भेदाभेदवरून भाजप कार्यकर्त्यांच्या संतापाचा भडका उडाला.
या वेळी बंदाेबस्तावरील पाेलिसांशीही हुज्जत घातली गेली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. या दाेन्ही प्रकारावरून नियाेजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून अाले. जिल्हाधिकाऱ्यांनीही यावरून नाराजी व्यक्त केली. त्याचबराेबर राज्यातील विराेधकांना सवलत तर सत्ताधाऱ्यांना दंडेली केल्याची चर्चाही परिसरात रंगली हाेती.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले जात अाहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत हाेती. जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ हेच अर्ज स्वीकारत हाेते. अखेरचा दिवस असल्यामुळे उमेदवारी दाखल करणाऱ्यांनी गर्दी केली हाेती. त्यात सकाळच्या सत्रात अामदार अमरिश पटेल यांनी अर्ज दाखल केला. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी वाहनांच्या ताफ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात थेट धडक दिली. नेत्यांच्या सुसाट अालेल्या गाड्या थेट कार्यालयाच्या अावारात अाल्याने एकच गर्दी झाली. त्यातच राेहिदास पाटील, राजवर्धन कदमबांडे, अामदार चंद्रकांत रघुवंशी, महापाैर जयश्री अहिरराव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचा एकच घाेळका जमला. हा सगळा जमाव इमारतीत तेथून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला. त्यातून गाेंधळ उडाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुपारी दाेन वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरील गेटपासून पाेलिसांचा कडक बंदाेबस्त लावण्यात अाला. यामध्ये उमेदवारी दाखल करायला येणाऱ्या भाजप-शिवसेनेचे नेते पदाधिकाऱ्यांची वाहने गेटवरच अडवण्यात अाली. रस्त्यावर ही वाहने लावण्याचे अादेश पाेलिसांनी दिले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना पायी चालत कार्यालयात जावे लागले. त्यानंतर भाजपचे उमेदवार गाेपाळ केले हे उमेदवारी दाखल करण्यासाठी अाले असता त्यांच्यासह कार्यकर्त्यांना प्रथम रस्त्यावरील मुख्य गेटवर अडवण्यात अाले. त्यानंतर इमारतीच्या प्रवेशद्वारावर अडवून केवळ पाच जणांना अात जाण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात अाले. त्या वेळी एकच गाेंधळ उडाला. त्यातून जाेरदार वादही झाला. यावेळी दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसाचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. बराच वाद झाल्यानतर अखेर सर्व कार्यकर्त्यांना इमारतीत जाऊ देण्यात अाले. तोपर्यंत वातावरण तणावपूर्ण होते. त्यानंतर प्रक्रिया सुरळीत पार पडली.

सकाळच्या सत्रात अामदार अमरिश पटेल हे लवाजम्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात इमारतीत दाखल झाले. मात्र, दुपारी त्यांचे बंधू भूपेश पटेल यांचे वाहन मात्र बाहेरच अडवण्यात अाले. दुपारी २.१८ वाजता भूपेश पटेल कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करायला पायीच अाले. त्यांनी अपक्ष अर्ज भरला.

भूपेश पटेलांचे वाहनही बाहेरच, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चडफड
मुख्यप्रवेशद्वारावर वाहन अडवण्याचा खरा फटका भाजपचे नेते कार्यकर्त्यांना बसला. मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहन अाणून ते पुन्हा रिव्हर्समध्ये मागे घेण्याची वेळ भाजपच्या नेत्यांवर अाली हाेती. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची चडफड हाेत हाेती. राज्यात सत्ताधारी असताना अाम्हाला गेटबाहेर अडवले जाते, असा संताप यातून व्यक्त हाेत हाेता. घोषणाबाजीतून हा संताप कार्यकर्त्यांनी काढला.

शिवसेनेचे मिर्लेकरही गेले चालत
जिल्हाधिकारीकार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार दुपारी दीड वाजेपासून बंद करण्यात अाले हाेते. त्यामुळे काेणतेही माेठे वाहन थेट इमारतीपर्यंत जाऊ शकत नव्हते. याचा पहिला फटका शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांना बसला. दुपारी १.४५ वाजता मुख्य द्वारावर त्यांचे वाहन पाेलिसांनी अडवले. त्यानंतर मिर्लेकर त्यांच्यासाेबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, मनपातील विराेधी पक्षनेते संजय गुजराथी इमारतीपर्यंत पायी चालत गेले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी ते पुन्हा पायी चालत बाहेर निघाले.

केवळ पाच जणांना दिली होती परवानगी
अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी असते. मात्र, काँग्रेस उमेदवार अर्ज दाख‌ल करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांची संपूर्ण केबिनभर नेते कार्यकर्ते हाेते. त्यांना बसायलाही जागा नव्हती. त्या वेळी पाेलिसांनी कुठलाही अटकाव केला नाही. त्यामुळे जमाव थेट केबिनमध्ये धडकला. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बंदाेबस्तावरील पाेलिसांची खरडपट्टी काढली.

कस्टडी डेथमुळे अडकून पडलो
उपविभागीयअधिकारीपद असले तरी सकाळच्या सत्रात जिल्हा कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाला हाेता. कस्टडी डेथ असल्यामुळे त्या ठिकाणी अापल्याला जावे लागले. त्यामुळे सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ बंदाेबस्त लावून अापण परतलाे. हिंमत जाधव, उपविभागीयपाेलिस अधिकारी.

कार्यकर्त्यांनाअटकाव चुकीचा
बाहेरीलअावारात कार्यकर्त्यांना राेखणे चुकीचे हाेते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने राेखल्यानंतर इमारतीतही राेखण्यात अाले. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वांना थेट अावारात प्रवेश दिला. हिरामण गवळी, भाजपनेते.
पुढील स्लाइड्सवर पाह, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या थेट आवारात आलेला काँग्रेस नेत्यांच्या वाहनांचा ताफा.
बातम्या आणखी आहेत...