आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेत राजकीय कुंभमेळा, एकमेकांना चिमटे काढत दिग्गजांनी साजरी केली राजकीय धुळवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळा अनावरणानिमित्त अायाेजित केलेल्या कार्यक्रमाला राजकीय कुंभमेळ्याचे रूप अाले हाेते. जिल्‍ह्यातील अाणि राज्यातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र अाल्याने अडीच तास चाललेल्या कार्यक्रमात दिग्गजांनी एकमेकांना चिमटे काढत राजकीय धुळवड साजरी केली. या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरलेले सभागृहातील प्रेक्षकदेखील ‘दी ग्रेट पाॅलिटिकल सर्कस’ पाहून तृप्त झाले.

सकाळी १२ वाजता पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर बंॅकेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. व्यासपीठावर महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह अामदार, बंॅकेचे संचालक उपस्थित हाेते. प्रल्हादराव पाटील यांच्या पत्नी चंद्रप्रभाताई पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात अाला. ताेंडावर अालेली जिल्‍हा बंॅकेची निवडणूक सर्वपक्षीय पॅनल करून बिनविराेध लढण्याची चर्चा सुरू असताना सर्वच नेेते एका व्यासपीठावर अाल्याने राजकीय टाेलेबाजी सुरू झाली. दाेन दिवसांपूर्वीच इशारे केल्याच्या वादामुळे राज्यभर गाजलेले गिरीश महाजन अाणि डाॅ.सतीश पाटील व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसले हाेते. एकमेकांची मस्करी करत त्यांनी दाेन दिवसांतील अनुभव शेअर केले. चिमणराव पाटील, पालकमंत्री एकनाथ खडसे अाणि खासदार ईश्वरलाल जैन यांच्यातही व्यासपीठावर मस्करी अाणि राजकीय टाेलेबाजी सुरू हाेती.

सत्कार अाणि भाषणामुळे लांबत चाललेल्या कार्यक्रमात पालकमंत्री खडसे यांनी साेबत अाणलेल्या चाॅकलेटपैकी एक सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. या वेळी दिलीप वळसे पाटील खडसेंनी सहकारमंत्र्यांना काेणते चाॅकलेट दिले हे उत्सुकतेने पाहत हाेते.

अधिवेशनाच्या काळात जलसंपदामंत्री महाजन डाॅ.सतीश पाटील यांच्यातील ‘इशारे’ प्रकरण चर्चेत असताना दाेन्ही नेते एकत्र अाले. त्यावेळी डाॅ.पाटील यांनी महाजनांना काय भाऊ कशी राहिली असे डिवचले, त्यावर महाजनांनीही बाेटाचा इशारा करत मस्करी केली.

कापसाची टाेलवाटाेलवी
१०दिवसांच्या उपाेषणामुुळे प्रकाशझाेतात अालेले गिरीश महाजन यांना प्रेक्षकांनी कापसाची अाठवण करून दिली. त्यांनी मी त्या खात्याचा मंत्री नाही, असे म्हणत खडसेंकडे प्रश्न टाेलवला. कापसाचे काय? असा माझाही प्रश्न असल्याचे ते म्हणाले. यावर महाजनांना शिवसेनेची संगत लागल्याचा चिमटा खडसेंनी काढला. जागतिक बाजारात काेणी कापूस घेण्यास तयार नाही. येत्या काळात मागणी वाढली तर शेतकऱ्यांना बाेनस देण्याचा विचार करू. तसेच एप्रिलपासून सर्वकक्ष विमा सुरू करू. नैसर्गिक अापत्तीत उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून मदत देऊ, असे अाश्वासन खडसेंनी दिले.

नाथाभाऊंची खरी परीक्षा
शेतकऱ्यांच्याप्रश्नावरून अाम्ही सभागृहात तुम्हाला साेडणार नाही. गाेंधळ घालण्याचे तंत्र अाम्ही गिरीश महाजनांकडून शिकलाे अाहाेत. अाता तुमची वेळ अाहे. अाम्हीदेखील गाेंधळ घालू, तुम्हाला काेंडीत पकडू, त्यामुळे खडसे साहेब तुमची खरी परीक्षा अाहे, असा टाेला दिलीप वळसे पाटील यांनी काढला. ग्रामीण अर्थकारणाला बळकट करण्यासाठी सहकारी संस्था भक्कमपणे चालवणे अावश्यक असल्याचे मतही त्यांनी या वेळी मांडले.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहातील भरगच्च सर्वपक्षीय राजकीय व्यासपीठ तर समाेर उपस्थित सहकार राजकीय क्षेत्रातील नेते, पदाधिकारी.

अाबांची अाठवण अन् काकांचा नकार
सन१९८५ मध्ये प्रल्हादराव पाटील यांनी विधानसभेच्या तिकिटासाठी मला एस. कॉंग्रेसमध्ये येण्याची अाॅफर दिली हाेती. परंतु माेरे काकांसाठी मी ती धुडकावली काका अामदार झाले, असा उल्लेख चिमणराव पाटील यांनी केला. त्यांचे भाषण सुरू असताना अॅड. माेरे यांनी जागेवरून हात हलवत चिमणरावांचा दावा फेटाळला. या प्रकाराकडे दुर्लक्ष करत भाषण सुरूच ठेवणाऱ्या चिमणरावांना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संजय पवारांनी राेखले. काेण खाेटे बाेलतय याची विचारणा केली. व्यासपीठावर कटाक्ष टाकत चिमणरावांनी डाॅ. सतीश पाटील हे माेरे काका अाणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मिष्किलपणे सांगितले. मी नव्हे तर काकाच खाेटे बाेलत असल्याचे देखील या वेळी ते म्हणाले. प्रास्ताविकातच झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
बातम्या आणखी आहेत...