आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीवर अत्याचार; नराधम शिक्षक सस्पेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ब.गो.शानभाग विद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थिनीशी लैंगिक अत्याचार करणारा नराधम उपशिक्षक नितीन चौक याला शालेय व्यवस्थापन मंडळाने निलंबित केले आहे. चौक याने पाचवीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण शुक्रवारी समोर आले होते. या प्रकरणात पालकांनी त्याला थेट शाळेत गाठून बदडले होते.
तत्पूर्वीही त्याने विद्यालयातील विद्यार्थिनींशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील तालुका पोलिस ठाण्यात लेखी स्वरूपात शुक्रवारी तक्रार केली होती. शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासण्याच्या प्रकाराने ब.गो.शानभाग विद्यालयाचे प्रशासन खडबडून जागे झाले. पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत व्यवस्थापन मंडळाची शनिवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा उपशिक्षक नितीन चौक याला निलंबित करण्यात आले, असे विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अनिल राव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.