आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cookery Contest In Jalgaon Presented Various Different Sweets

लाडू, करंजीने तोडाला पाणी; बीट आणि टमाट्याच्या व्‍यंजनाने सारे झाले थक्‍क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळीची तयारी नवरात्रोत्सवानंतर सुरू होत असते मात्र बचतगटांच्या महिलांची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जनता बँक बचतगटांतर्फे शुक्रवारी शहरातील बचतगटांसाठी ‘दिवाळी फराळ स्पर्धा’ आयोजित केली होती. यात विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ महिलांनी बनविले होते. पौष्टिक लाडूचे विविध प्रकार आणि करंजी फराळाने अनेकांच्या तोडाला पाणी सोडले.

जनता बँक बचतगटाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गृहउद्योग केले जातात. जेणेकरून बचतगटाच्या महिलांना प्रोत्साहन मिळेल हाच या मागचा उद्देश आहे. त्या आनुशंगाने ‘दिवाळी फराळ स्पर्धा’ आयोजित केली होती. यामध्ये पौष्टिक आणि चविष्ट अशा दोन्ही गोष्टींचा समावेश महिलांनी आपल्या फराळाच्या पदार्थांमध्ये केला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंखे, शोभा पाटील उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून शैला चौधरी व जनता बँक नवीपेठ मुख्य शाखेतील कर्ज विभागप्रमुख शिल्पा जोशी यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी बचतगटाच्या उपव्यवस्थापिका वैशाली महाजन, समन्वयक अनिता वाघ, वर्षा पिंगळे, सुलोचना सोनवणे, सुरेखा साळुंखे, मनीषा आवारे, माया चौधरी, सुवर्णा पेठकर यांनी सहकार्य केले.

लाडूंचे विविध प्रकार

फराळात गोड पदार्थांचा समावेश करण्यासाठी सर्वात मुख्य पदार्थ म्हणून लाडूला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे स्पर्धेत महिलांना विविध प्रकारचे लाडू तयार केले होते. यात बेसन, मैद्याचे लाडू, खोबरा मलई टाकून केलेले लाडू, नारळी पाकाचे, मुगाच्या पीठाचे, तांदळाचे लाडू तयार करण्यात आले होते. यामधील बीट आणि टमाट्याचे लाडू प्रकार हे सारे आकर्षक ठरले. हे लाडू बीट आणि टमाट्याच्या प्युरीपासून तयार केले होते. त्यात मावा, दूध, साखर,ड्रायफ्रूट टाकण्यात आला होता.