आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजीच्या पेपरला 21 कॉपीबहाद्दर; कॉपीमुक्त अभियानाचे वाजले की बारा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला जिल्ह्यात 21 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर पालकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केल्याने भरारी पथकांना उपद्रव रोखणे कठीण गेले.

दहावीचा कठीण समजला जाणारा इंग्रजी विषयाचा पेपर गुरुवारी झाला. या पेपरसाठी केंद्रांवर पालकांची गर्दी झाली होती. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान राबवण्यात आले. तसेच शहरात केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली. त्यात सापडलेल्या कॉप्या जप्त करण्यात आल्या; मात्र तरीही काही केंद्रांवर पाणीवाटप करणार्‍या मुलांकडून व छुप्या पद्धतीने सर्रास कॉप्या चालल्या. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यात 21 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात नीळकंठेश्वर विद्यालय (चावलखेडा)- 2, गो.पु.पाटील विद्यालय (तामसवाडी)- 1, सर्मथ हायस्कूल (पारोळा)- 1, एनईएस बॉइज अँण्ड गल्र्स हायस्कूल (पारोळा)- 2, रा.का.मिश्रा विद्यालय (बहादरपूर)- 1, सवरेदय विद्यालय (किन्नी, ता.भुसावळ) येथे 4 व अन्य विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. दरम्यान, ग्रामीण भागातील केंद्रांबाहेर उपद्रव वाढल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे भरारी पथकांसह पोलिसांनाही कठीण झाले. जमावाला आवरताना पथकातील अधिकार्‍यांच्याही नाकीनऊ आले. त्यामुळे तीन तास केंद्रांबाहेर गर्दी कायम होती. शशिकांत हिंगोणेकर यांनी धरणगाव व चावलखेडा केंद्राला भेटी दिल्या.