आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेअर कमिटीत नेत्यांची एकी, बैठकीत कार्यकर्त्यांचे मतभेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा भाजपच्या काेअर कमिटीची शनिवारी दुपारी १२.३० ते वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत भाजपच्या सर्व स्थानिक नेत्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात हास्य विनाेद करत स्नेहभाेजन केले. मात्र, त्यानंतर झालेल्या जिल्हा बैठकीत नेते एकत्र, तर याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकत गाेंधळ घातला.
अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाैरा असल्याने शनिवारी पक्षाच्या जिल्हा काेअर कमिटीची बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, अामदार हरिभाऊ जावळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह काेअर कमिटीचे सदस्य उपस्थित हाेते. नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, विधान परिषद, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने बैठकीत त्या अनुषंगाने चर्चा झाली. बैठकीत दाेन्ही नेत्यांशिवाय अामदार संजय सावकारे, अामदार उन्मेष पाटील, अामदार सुरेश भाेळे, अामदार स्मिता वाघ, अामदार गुरुमुख जगवाणी, प्रभारी अामदार नरेंद्र पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग काेळी, संघटन मंत्री किशाेर काळकर, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. राेहिणी खडसे-खेवलकर, प्रभाकर पवार, सुनील नेवे उपस्थित हाेते. दुपारीबैठकीत विविध विषयांवर मंथन करण्यात अाले. त्यानंतर काेअर कमिटी सदस्यांनी कार्यालयात सहभाेजनही घेतले.

बैठक रद्द करण्याची नामुष्की अाेढवली
बैठकीत कार्यक्रम पत्रिकेबाबत काेणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा काही कमिटी सदस्यांनी केला अाहे. परंतु, या बैठकीनंतर अायाेजित जिल्हा बैठकीत मात्र निमंत्रण पत्रिकेतील अामदार खडसे यांच्या नावावरून कार्यकर्त्यांनी गाेंधळ घातला. त्यामुळे बैठक रद्द करण्याची नामुष्की अाेढवली.
बातम्या आणखी आहेत...