आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात क्रॉम्प्टनलाही ग्राहकांचा ठेंगा; एक अब्ज रुपये थकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोठे उद्योजक वीज बिल थकवतात असे सर्वत्र बोलले जाते, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. विजेचा घरगुती वापर करणार्‍या सामान्य नागरिकांनीही वीज वितरण कंपनीला ठेंगा दाखवला आहे. खासगीकरणानंतरही शहरासह तालुक्यातील वीज ग्राहकांकडे एक अब्ज 28 कोटी रुपयांची थकबाकी आहे. महावितरणच्या अन्य 11 तालुक्यांच्या तुलनेत क्रॉम्प्टनची थकबाकी ही 20 टक्के अधिक आहे.

अशी आहे थकबाकी
जळगाव परिमंडळात वीज बिलापोटी 7 अब्ज 37 कोटी 5 लाख 18 हजार 240 रुपये तर फ्रॅन्चायझी असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हजची एक अब्ज 28 कोटी 9 हजार 610 रुपयांची अशी एकूण 8 अब्ज 65 कोटी 14 हजार 850 रुपयांची थकबाकी सामान्य ग्राहकांकडे आहे. परिणामी पावसाळ्यातही ग्रामीण भागात भारनियमन सुरू आहे.

परिमंडळ 74 टक्के भारनियमनमुक्त
जळगाव परिमंडळात 449 फीडरपैकी 337 फीडर भारनियमनमुक्त आहेत. 112 फीडर्सवर भारनियमन सुरू आहे. परिमंडळ 74 टक्के भारनियमनमुक्त झाले आहे. वीजजोडण्या घेतल्यापासून एकदाही बिलाचा भरणा न करणार्‍यांचाही यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात 2 टक्के गावे शंभर टक्के थकबाकीदार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. यामुळे प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करणार्‍या ग्राहकांना याचा फटका बसत असून त्या ग्राहकांना 6 ते 11 तासांचे भारनियमन सोसावे लागत आहे.