आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा : अपात्रतेची भीती, क्षेत्रसभेचा सपाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई हाेऊ शकते, याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले हाेते. यानंतर खडबडून जागे झालेल्या नगरसेवकांकडून क्षेत्रसभेचा सपाटा सुरू करण्यात अाला अाहे. गुरुवारी गणेश काॅलनी अाणि रिंग राेड परिसरात दाेन प्रभागांमध्ये क्षेत्रसभा घेण्यात अाल्या.
काही नगरसेवकांमध्ये कायद्याचे अज्ञान अाणि मतदारांसमाेर जाण्यास भीती वाटत असल्याने क्षेत्रसभा घेतल्या जात नव्हत्या. क्षेत्रसभा घेणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई हाेऊ शकते, याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले हाेते. याची दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर चाैकशी सुरू झाली अाहे.

दाेन ठिकाणी घेतल्या क्षेत्रसभा

गणेश काॅलनी भाग : प्रभागक्रमांक १० "अ' "ब'मध्ये नगरसेवक अश्विन साेनवणे अाणि नगरसेविका जयश्री नितीन धांडे यांनी क्षेत्रसभा घेतली. या क्षेत्रसभेला प्रभाग अधिकारी अ.वा.जाधव, सहायक अाराेग्य अधीक्षक एस.बी.बडगुजर, विलास पाटील, अार.यू.पाटील, नरेंद्र चाैधरी, कैलास साेनार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते. नागरिकांनी वाॅर्डातील समस्या अाणि काेणती कामे प्राधान्याने करावी? यासंदर्भात अापल्या सूचना मांडल्या.

रिंग राेड परिसर : प्रभागक्रमांक १९ "अ' "ब'मध्ये अामदार सुरेश भाेळे यांच्या पत्नी सीमा सुरेश भाेळे अाणि दीपमाला मनाेज काळे यांनी अापल्या वाॅर्डात क्षेत्रसभा घेतली. या क्षेत्रसभेस प्रभाग अधिकारी अ.वा.जाधव यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित हाेते. क्षेत्रसभेच्या अायाेजनासंदर्भात प्रभाग अधिकाऱ्यांकडून व्यापक प्रसिद्धी केली जात नसल्याने, नागरिकांची संख्या माेजकीच दिसत अाहे.