आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation, Department Of Health,latest News In Divya Marathi

साहित्य खरेदीत घोटाळा, व्यवहार तपासून गुन्हे दाखल करणार : आयुक्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या आरोग्‍य विभागाकडून केल्या गेलेल्या साहित्य खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. शहरात साचणारा कचरा संकलित करण्यासाठी सिमेंटच्या 350 कचराकुंड्यांची खरेदी करण्यात आली होती. मात्र, त्या कचराकुंड्या सध्या कुठेही दिसून येत नसल्याने त्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या खरेदीत मोठा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
पालिकेत स्वच्छतेसाठी गेल्या काही वर्षांत झाडू, टिकम, फावडे, टोपले आणि इतर साहित्य खरेदीवर लाखो रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहेत. खरेदी झालेल्या साहित्याची बिले संबंधित मक्तेदारांना अदादेखील करण्यात आला आहेत. कागदोपत्री साहित्य खरेदी दिसत असली तरी, ते वाटप कुठे झाले? याचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. सन २००६मध्ये शहरातील चौकाचौकात कचरा साठवण्यासाठी सिमेंटच्या 350 कुंड्या खरेदी करण्यात आल्‍या होत्‍या. तसेच प्रत्येक कुंडीची किंमत सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये दाखवण्यात आली होती. मात्र, या कचराकुंड्या सध्या शहरात कुठेही दिसत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आरोग्‍य विभागाने साहित्य खरेदीत मोठा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी समोर येत असल्याने ही बाब आयुक्तांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणामध्ये थेट गुन्हे दाखल करण्याची तयारीही आयुक्‍त संजय कापडणीस यांनी दर्शवली आहे. जबाबदारी निश्चित करा
आरोग्‍य विभागाच्या साहित्य खरेदीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. यासंदर्भात सात-आठ वर्षांतील खरेदीच्या सर्वच बाबी तपासून संबंधितांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. अनिलनाटेकर, अध्यक्ष,शहीद भगतसिंग संघटना