आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेच्या जागांवर शाळा, मंगलकार्यालय अन् पतसंस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सार्वजनिक हितासाठी दिलेल्या खुल्या जागांवर थेट शाळा, मंगल कार्यालय व पतसंस्था उभारून व्यावसायिक वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दोन दशकांनंतर पालिकेने अशा जागांकडे मोर्चा वळवला आहे. कराराचा भंग केल्याप्रकरणी 59 संस्थाचालकांना नोटीस बजावल्या आहेत. यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांच्या पतपेढीचाही समावेश आहे.

नेहरू चौकात स्थानिक नागरिकांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर जगन्नाथ वाणी यांनी खोल्या बांधून अतिक्रमण केले होते. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रार करताच कारवाईला सुरुवात झाली. फुले मार्केटमधील हॉकर्सधारकांचेही अतिक्रमण काढण्यात पालिकेला यश आले आहे. आता प्रशासनाने काही वर्षांपूर्वी देखभाल व सार्वजनिक हितासाठी हस्तांतरित केलेल्या जागांकडे मोर्चा वळवला आहे. शहरात पालिकेच्या 397 खुल्या जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 59 जागांची निवड केली आहे. या जागांवर संस्थाचालकांनी थेट मंदिर, वाचनालय, वसतिगृह, व्यायामशाळा, मंगल कार्यालय, तसेच शाळा बांधून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे.

फुले मार्केटमधील किरकोळ व्यवसाय करून गुजराण करणार्‍यांचे अतिक्रमण काढण्यापेक्षा मोठ्या धेडांवर कारवाई करावी, असा सूर उमटत होता. त्यामुळे पालिकेने आता कोणताही भेदभाव न ठेवता आपला मोर्चा बड्यांकडे वळवला आहे.
या संस्थांनी खुल्या जागांचा केला व्यावसायिक वापर
व्यायामशाळेसाठी वापर : माजी खासदार वाय.जी. महाजन जिम्नॅशियम हॉल, क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब.
हॉल-मंगल कार्यालयासाठी वापर : गुजराथी सेवा मंडळ, महेश प्रगती मंडळ, अमर शहीद संत कंवरराम संस्था, आदिवासी कोळी समाज मंडळ, परमार्थ साधना, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था, रोटरी क्लब जळगाव, हटकर समाज प्रगती मंडळ, आदिवासी तडवी समाज मंडळ, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, स्व.शांताबाई बाबुराव पाटील सभागृह, लाडशाखीय वाणी विकास मंडळ, कासार सेवा संघ जळगाव, अग्रवाल विकास ट्रस्ट, लायन्स क्लब, भोई समाज विकास मंडळ, अणुव्रत भवन, जळगाव झोरास्टियन ट्रस्ट, पार्वतीनगर मित्र मंडळ.
स्वाध्याय मंदिर : जळगाव जिल्हा नित्य मुक्तानंद सिद्ध मार्गीय साधक ट्रस्ट, प्रजापिता ब्रम्हकु मारी ईश्वरी विश्व विद्यालय, आर्ट आॅफ लिव्हिंग, श्री योग वेदांत सेवा समिती.
शैक्षणिक वापर (शाळा, क्रीडांगण) : खान्देश एज्युकेशन सोसायटी, बालनिकेतन विद्यामंदिर, श्रीराम तरुण मित्र मंडळ, उज्ज्वल एज्युकेशन, जयदुर्गा भवानी मंडळ, रुस्तमजी एज्युकेशन ट्रस्ट, क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी, इकरा एज्युकेशन व मिल्लत एज्युकेशन सोसायटी, सिद्धिविनायक मंदिर, जयभवानी बहुउद्देशीय संस्था सुप्रीम कॉलनी, भाऊसाहेब उत्तमचंद रायसोनी फाउंडेशन, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, रंभालक्ष्मी बहुउद्देशीय संस्था, इकरा एज्युकेशन सोसायटी, मुस्लिम शहा बिरादरी, ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, एसएमआयटी कॉलेज.

अनाधिकृत बांधकाम : जिल्हा कामाटी जमात संघ , सद्गुरू तोताराम महाराज व नवचैतन्य मंडळ.
अखिल विश्व गायत्री परिवार ( होमिओपॅथी चिकित्सालय व साहित्य केंद्र), गुलाबराव देवकर पतपेढी (पतपेढीसाठी), वल्लभदास वालजी वाचनालय (वाचनालय व हॉल), नवश्री महिला मंडळ (हॉल व मैदान), केरळी महिला ट्रस्ट (मंदिर), अखिल भारतीय संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन गु्रप (मंदिर व रहिवास), मराठा सेवा संघ संचलित मुलींचे वसतिगृह (दुमजली वसतिगृह), जागृती महिला मंडळ (जिल्हा बॅँकेला भाड्याने खोल्या दिल्या आहेत), छबिलदास खडके यांनी खळे प्लॉट दर्शवून भूखंड विक्री केले (सन 1978-80) (वस्ती), दधिच आश्रम समिती (वापराबाबत स्थानिक रहिवासींची तक्रार), जळगाव नागरी सहकारी पतपेढी (हॉल बंद अवस्थेत व अनाधिकृत खोल्यांमध्ये रहिवास वापर), विद्यार्थी विकास प्रतिष्ठान (हॉस्टेल व लायब्ररी).
काय आहे नोटीसीत
महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 81 ब (1) नुसार ही नोटीस बजावली आहे. खुली जागा ही नगरपालिकेने देखभाल व सार्वजनिक विकासासाठी हस्तांतरीत केली आहे. परंतु संबंधित जागा करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार विकसित केलेली नाही. त्यामुळे करार भंग झाला आहे. त्यामुळे ही जागा काढून का घेण्यात येऊ नये? असा प्रश्न नोटीसमध्ये केला आहे. आयुक्तांच्या सहीने या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांत खुलासा मागवला आहे.
(फोटो - संग्रहीत फोटो)