आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांनो, क्षेत्रसभा घ्या; जळगाव मनपा प्रशासनाचे विनंतीपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रत्येक प्रभागात क्षेत्रसभा घेणे आवश्यक आहे. परंतु अद्यापपर्यंत अनेक नगरसेवकांनी क्षेत्रसभा घेतलेल्या नाही. क्षेत्रसभेच्या अायाेजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे कार्याध्यक्ष प्रभाग अधिकारी असल्याने त्यांच्याकडून नगरसेवकांना क्षेत्रसभा घेण्याबाबत विनंतीपत्र देण्याचे काम सध्या सुरू झाले अाहे. तर दुसरीकडे नगरसेवकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने याला प्रशासन जबाबदार असल्याची अाेरड नगरसेवकांमधून आता होऊ लागली अाहे.
वाॅर्डातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फुटावी, वाॅर्डात काेणती कामे अाधी काेणती नंतर व्हावीत याची प्राथमिकता प्रशासनापर्यंत पाेहाेचवता यायला हवी, यासंदर्भात क्षेत्रसभेत चर्चा हाेते. मात्र, या तरतुदीबाबत गांभीर्य नसल्याने मनपाच्या ७३ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई हाेऊ शकते, याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले हाेते.
क्षेत्रसभा अायाेजित करण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर असते. प्रभाग अधिकारी क्षेत्रसभेचे कार्याध्यक्ष असल्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याने नगरसेवक अपात्रता प्रकरण अंगलट येऊ शकते, याची जाणीव झाल्याने प्रभाग अधिकाऱ्यांकडून अाता क्षेत्रसभा घेण्यासंदर्भात पत्र दिले जात अाहे.

पत्रातील अाशय असा

दाेनवर्षांच्या कालावधीत सलग चार क्षेत्रसभा घेणे अनिवार्य अाहे. कार्याध्यक्ष क्षेत्रसभेची बैठक बाेलावेल त्याची वेळ, दिनांक अाणि ठिकाण निश्चित करेल. त्यामुळे अापणास विनंती करण्यात येत अाहे की, क्षेत्रसभा घेण्याबाबत दिनांक वेळ कळवावी, जेणेकरून अायाेजन करणे साेईस्कर हाेईल, असे या पत्रात नमूद अाहे.
अधिकाऱ्यांना चकायद्याचे अज्ञान; पत्रात जुना संदर्भ

मुंबईप्रांतिक महापालिका अधिनियम १९४९च्या तरतुदीनुसार अातापर्यंत राज्यातील महापालिकांचा कारभार चालत हाेता. त्यात सुधारणा करून त्याचे‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम’मध्ये रूपांतर करण्यात अाले असून, त्यानुसार कारभार चालवला जाताे. मात्र, प्रभाग अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांना पत्रव्यवहार करताना ‘मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९’चाच संदर्भ दिला जात अाहे.