आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक विनायक सोनवणे खून खटला; २६वा साक्षीदार झाला फितूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नगरसेवक विनायक सोनवणे खून खटल्यातील २६वा पंच साक्षीदार ईश्वर जावळे हा बुधवारी न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात फितूर झाला. या वेळी खून होताना आणि मित्रांना फोन केल्याचे त्याने नाकबूल केले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी मार्च रोजी होणार आहे.
सोनवणे खून खटल्यात बुधवारी २६वा साक्षीदार ईश्वर जावळे यांची सरकारी वकील अॅड. गोपाळ जळमकर यांनी उलट तपासणी घेतली. यात त्यांनी १८ डिसेंबर २०१२ला विनायक सोनवणे यांचा खून झाला त्यादिवशी ख्वाजामियाँ दर्ग्याजवळ असलेल्या चढ्ढा क्लासेसला गेला होता का? तसेच लॉ-कॉलेजच्या ग्राऊंडजवळ सोनवणे यांच्यावर राजहंस सूर्यवंशी आणि पवन सूर्यवंशी यांनी हल्ला करताना पाहून त्याबद्दल प्रशांत शिंपी आणि मयूर पाटील या दोन्ही मित्रांना कळवले होता का? असे विचारले. त्या वेळी ईश्वरने मी चढ्ढा क्लासेसला जात नव्हतो आणि कोणत्याही मित्राला गीताशंकर स्वीमिंग टँकजवळील कॉइन बॉक्सवरून फोन केला असल्याचे सरकारपक्षाचे म्हणणे नाकारले.

अॅड.जळमकर यांनी घेतली उलटतपासणी

अॅड.जळमकर यांनी ईश्वरला विचारले की, एक डोळ्याने अंधळा असलेला राजहंसचा दुसरा मुलगा हर्षल तुला घेऊन कारागृहात गेला होता. त्या वेळी पवन याने आमच्या विरुद्ध साक्ष दिली, तर विनायकसारखे तुलाही भोगावे लागेल, अशी धमकी दिली होती. मात्र, सरकारपक्षाचे हेसुद्धा म्हणणे ईश्वरने न्यायालयात नाकारले. बचावपक्षातर्फे अॅड.अ.वा.अत्रे यांनी साक्षीदार तपासण्यास नकार दिला.