आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांनी पळपुटेपणा करू नये, नगरसेवकांची अपेक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने दररोज नागरिकांच्या असंख्य समस्या एेकून घेतो; त्यांचा सामना करतो, त्यापासून लांब जाता त्या सोडवण्यासाठी पाठपुरवठा करत असतो. अधिकार्‍यांनीही बदली करून पळपुटेपणा करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे खुले आवाहन नगरसेवकांनी केले आहे.

महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात यांनी फॅक्स पाठवून कार्यमुक्त करण्याची विनंती आयुक्त संजय कापडणीस यांना केली आहे. लेखाधिकारी या पदावर काम करताना त्रास होतोय. काम करण्याची मानसिकता नसल्याची भावना व्यक्त केली आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त हाेऊ लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरातील जनताही हाल सहन करत आहे. लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवक काही राजीनामा देऊन टाळत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अधिकार्‍यांनी उलट यातून लवकरात लवकर मार्ग कसा निघेल त्यांच्या कार्यकाळात वाईटानंतर चांगले दिवस कसे येतील, समस्या कशा पद्धतीने सुटतील. सुविधा कशा निर्माण हाेतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अधिकार्‍यांची भूमिका अयाेग्य
चंद्रकांत खरात यांनी कार्यमुक्तीसाठी पत्र देणे गंभीर आहे. त्यांनी कार्यमुक्त होता स्वेच्छा निवृत्ती घ्यावी तसेच रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात यावे. म्हणजे नगरसेवक म्हणून काम करताना काय सहन करावे लागते हे त्यांना कळेल. अधिकार्‍यांची अशी भूमिका आजतरी योग्य नाही. जयश्रीनितीन पाटील, नगरसेविका, भाजप

पळता कशाला, सामोरे जा
अधिकार्‍यांनी अशा पद्धतीने कार्यमुक्तीसाठी फॅक्स पाठवून पळपुटेपणा करणे योग्य नाही. आम्ही जसे जनतेला सामोरे जातो तसे अधिकार्‍यांनीही बाजू एेकून घ्यावी. उलट नगरसेवकांएेवढ्या तक्रारी अधिकार्‍यांकडे येतच नाहीत. त्यामुळे "अच्छे िदन' कसे येतील यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ज्योतीचव्हाण, सभापती, स्थायी समिती
बातम्या आणखी आहेत...