आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरांची तत्काळ करा मोबाइलवरून तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; शासनाच्याप्रत्येक विभागात दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार वेगाने होत आहे. आता सर्वच व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असल्यामुळे सर्वांच्या हातात स्मार्टफोन दिसायला लागले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराविषयी तक्रार करण्यासाठी वेळेची बचत म्हणून राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता ‘एसीबी अॅप’ कार्यान्वित केले आहे. त्यामुळे एखाद्या लाचखोराने लाच मागितल्यास नागरिकांना त्याच्यासमोरच जागच्या जागी मोबाइल अॅपच्या माध्यमातून सहजच तक्रार करता येणार आहे.
लाचखोराबाबत तक्रार करण्यासाठी यापूर्वी एसीबीने टोल फ्री क्रमांक आणि ऑनलाइन तक्रारींचा पर्यायसुद्धा खुला केला आहे. आता एसीबीतर्फे मोबाइल अॅप तक्रारदारांसाठी खुला केला आहे. यासाठी मोबाइलच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये www.acbmaharashtra.net हे अॅप कायमस्वरुपी सेव्ह करता येणार आहे.
या साइटला भेट दिल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असे ओपन होऊन लाचेच्या मागणीची तक्रार, अपसंपदेची तक्रार, पदाचा दुरुपयोग, कार्यप्रणाली आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न, असे ऑप्शन येतात. ही सर्व माहिती भरल्यानंतर शक्य असल्यास भ्रष्टाचार तक्रार समर्थनार्थ फोटो, ऑडिओ क्लिप किंवा व्हिडिओ पुराव्यासह अपलोड करता येतो. त्यानंतर नावासह मोबाइल नंबर आणि सहा आकडी सत्यापन कोड टाकावा लागतो. अशी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपली तक्रार एसीबीकडे लगेच प्राप्त होते. त्यानंतर लगेच एसीबीकडून सहा अंकी कोड येतो. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येते.

पारदर्शी कारभारास चांगला पर्याय
भ्रष्टाचारसंदर्भाततक्रार केल्यास तिची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जावी. त्याचप्रमाणे तेथूनच कारवाईचे आदेश निघाल्यानंतर त्यावर कारवाई होत असते. हे ऑनलाइन टोल फ्री क्रमांक सुरू केल्यापासून राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे भ्रष्टाचाराबाबतच्या सर्व तक्रारी ऑनलाइनच्या कार्यकक्षेत याव्यात म्हणून राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे.

भ्रष्टाचाराच्या तक्रारी पुराव्यासह कराव्यात
नागरिकांकडेकुणी लाचेची मागणी केल्यास त्याची तक्रार लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी. तक्रारी करण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसे पुरावे असल्यास पाठवावे. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. तक्रारदार करणाऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी आणि टोल फ्री क्रमांकाचा वापर अधिकाधिक प्रमाणात करावा. डी.डी. गवारे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग