आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पगारात भागवा’ अभियानातून भ्रष्टाचारमुक्त शासनाचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पगारात भागवा म्हणजेच हव्यास टाळा, या अर्थबोधाने लोभ धरता आपले जीवन यशस्वी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘पगारात भागवा’ हे अभियान सुरू केले आहे. ‘भ्रष्टाचार संपावा, आटोक्यात राहावा’ ही थीम घेऊन महासंघ हे अभियान राबवत आहे. या अंतर्गत ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळाही होणार आहे.

राजपत्रित अधिकारी महासंघाने जिल्ह्यात वर्ग-१ श्रेणींमधील तीन हजारांवर सभासद आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी महासंघाचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणून राेजी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कायआहे अभियान? : अधिकाऱ्यांनापुरेसा पगार मिळतो. त्यामुळे त्यांनी अधिक लोभात पडून बदनामीकारक कारवाईस सामोरे जाऊ नये, असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. तसेच या अभियानाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी धोरणही निश्चित केले आहे. जे अधिकारी वा कर्मचारी गैरव्यवहार करताना सापडतील, त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटले दाखल करण्याची मागणीही केली जाणार आहे. त्यात चौकशीअंती दोषी आढळलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरला जाईल. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार सिद्ध झालेल्यांना निर्दोष ठरवण्यासाठी कोणतेही निवेदन शासनाकडे पाठवले जाणार नाही. यासह भ्रष्टाचारी अधिकारी वा कर्मचाऱ्यांना महासंघ किंवा संलग्न संघटनांमध्ये पदाधिकारी अथवा सदस्य म्हणून स्वीकारणार नसल्याची आचारसंहिता तयार केली आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून महासंघातर्फे मागण्या शासनकडे पोहचविल्या जात आहे.

आदर्श कार्यालय प्रमुखाची संकल्पना : नियमितपणा,कार्यतत्परता, वरिष्ठांविषयी आदर, जनतेबद्दल आत्मीयता ठेवणे यासह भ्रष्ट आचरणापासून दूर राहण्याचा आदर्श कर्मचाऱ्यांपुढे ठेवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांची संघटना हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव करून देणारी जबाबदार संस्था असल्याची प्रचिती या अभियानाच्या माध्यमातून आणून देणार, असा दावा महासंघातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, अधिकारीवर्गाने प्रथमच राबवलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न
शासकीय अधिकाऱ्यांबाबत जनमानसात तयार झालेली प्रतिमा बदलण्यासह प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे काम समाजापुढे यावे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासनाबाबत प्रचार केला जाणार आहे. राज्यभर हे अभियान सुरू असून, जिल्ह्यात गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या अभियानाची संकल्पना नियोजन स्पष्ट केले जाणार आहे. राजूसाळुंखे, जिल्हाध्यक्ष, राजपत्रित अधिकारी महासंघ