आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतील बेकायदा भरतीचा पंचनामा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नगरपालिका असताना सत्तेच्या माध्यमातून नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू आता सरकायला सुरुवात झाली आहे. आस्थापना विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या विशेष लेखापरीक्षणाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच त्यापूर्वी प्रत्येक विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात येत आहे. तीन दिवसांत प्रत्येक विभागाची माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात गरज नसलेल्या कर्मचाऱ्यांना आता डच्चू मिळणार आहे.

महापालिका स्थापन होऊन १० वर्षे उलटली तरी अजूनही नगरपालिका असतानाचा आकृतिबंधानुसारच आस्थापना विभागाचा कारभार सुरू आहे. सद्य:स्थिती पाहता पालिकेच्या प्रत्यक्ष उत्पन्नाच्या ७० टक्के खर्च हा वेतनावर होत आहे. तसेच जुन्या आकडेवारीनुसार कार्यपद्धतीचा अवलंब होत असल्याने गरज किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती किती? याची माहितीच पालिकेच्या दप्तरी नाही. त्यामुळे आता आस्थापना विभागाचे विशेष लेखापरीक्षणाची गरज व्यक्त होत आहे. त्याचे पहिले पाऊल प्रशासनाने मंगळवारी टाकले. सामान्य प्रशासनाचे उपायुक्त अविनाश गांगाेडे यांनी प्रत्येक विभागाकडून त्यांच्या कार्यालयात नियुक्त कर्मचाऱ्यांची सखाेल माहिती मागवली आहे.

कामचुकारांनाडच्चू : नगरपालिकाअसताना १९९७-९८ मध्ये एकाच िदवशी ४०० ते ४५० जणांना पालिकेच्या नोकरीत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात नियुक्ती झाली होती. यात पालिका आयुक्तांना शंका वाटत असल्याने आता याबाबत संपूर्ण माहिती मागवली आहे. न्यायालयीन रोजंदारी कर्मचारी तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन िनयमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिलेआहेत. तसेच प्रत्येक विभागात कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या कार्यभारासह त्याची गरज आहे की नाही, याचा अभिप्राय मागवला आहे. पुरेसा कार्यभार नसल्यास अनावश्यक पदे असा शेरा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आकृतिबंधमागवला : पालिकेतसध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक पात्रता, सद्या बजावत असलेले कर्तव्य, याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखाकडून सखाेल माहिती मागवण्यात आली आहे. पालिकेची संपूर्ण माहिती मागविल्यानंतर आस्थापना विभागाचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

सध्याची सेवा ज्येष्ठता यादी सदोष
महापालिकेतीलसध्याची सेवाज्येष्ठता यादी सदोष आहे. त्यामुळे पदोन्नती कशाच्या आधारे करावी ? असा प्रश्न आहे. पालिकेचा आकृतिबंध तयार नाही. नगरपालिका असतानाचा आकृतिबंध आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून उपायुक्त गांगाेडे यांनी माहिती एकत्र करायला सुरुवात केली होती. आता खऱ्या अर्थाने पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर भरतीचा पंचनामा सुरू होणार आहे.