आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच दिल्याने कैद्याला कारागृहामध्ये मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कारागृहातसुभाष आकुलकर खून प्रकरणात संशयित अाराेपी असलेल्या कमलेश जैस्वाल याने पाच दिवसांपूर्वी कुटंुबीयांची भेट घेण्यासाठी विनंती केली हाेती.

भेट घडवून अाण्यासाठी २०० रुपयांची लाच दिली नाही म्हणून सुरक्षारक्षकाने कमलेशला मारहाण केल्याचे गुरुवारी उघडकीस अाले.

गुरूवारी सुनावणीसाठी आलेल्या कमलेशने मारहाणीबाबत वकिलांमार्फत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दिला. तसेच

सुरक्षारक्षकाने काठीने त्याच्या तळपायावर मारल्याने त्याला दोन दिवस चालताही येत नव्हते. मारहाणीच्या खुणा त्याने न्यायाधीशांना दाखवल्या. त्यामुळे न्यायाधीशांनी

कारागृह अधीक्षकांकडून खुलासा मागवला अाहे. बचाव पक्षातर्फे अॅड.प्रकाश बी.पाटील, तर फिर्यादीतर्फे अॅड.महेश ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान जैस्वालसह त्याच्या

साथीदारांना यापूर्वीही मारहाण झाली आहे. तशा तक्रारी त्यांनी कारागृह पोलिस अधीक्षकांकडे केली असून त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.

पैसेवाल्यांचे कारागृह
जळगावकारागृहातील बड्या (पैसेवाल्या) संशयितांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. यासंदर्भात अनेक वेळा पुराव्यांसह वृत्तही प्रकाशित झाले आहे.

दुसरीकडे पैसे देऊ शकणाऱ्या संशयित कैद्यांना मात्र मारहाण सक्ती केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून असे प्रकार उघडकीस येत आहेत.