आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांपूर्वी खड्ड्यांची केलेली तात्पुरती मलमपट्टी ठरली उधळपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले अाहेत. त्यामुळे वाहन चालवतानाच नाही तर पायी चालतानाही नागरिकांना कसरत करावी लागते. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने घसरून अपघात हाेतात. सर्वच रस्त्यांवर खड्डे झाले अाहेत. प्रारंभी पावसाने रस्त्यांवरील हे खड्डे उघडे केले हाेते. त्यामुळे दाेन महिन्यांपूर्वी महापालिकेने ठेका देऊन खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र ही मलमपट्टी उधळपट्टी ठरली. पैसा वाया घालवूनही नागरिकांना मात्र खड्ड्यांमधूनच वाट काढावी लागत अाहे. यात विशेष म्हणजे नगराेत्थान याेजनेतून झालेल्या रस्त्यांवरही माेठ्या प्रमाणात खड्डे झाले अाहेत. 
 
शहरातील मुख्य रस्ता जुना मुंबई-आग्रा महामार्ग आहे. या रस्त्यावर मध्यभागी खड्डे पडल्याने वाहतुकीला त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याने शहरातील सर्वाधिक वाहतूक होते. मुख्य रस्ता असून शहरातील मुख्य बाजारपेठ शासकीय कार्यालयांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक होते. यावर महाविद्यालयापासून देवपूर बसस्थानकापर्यंत मध्यभागात खड्डे झाले आहेत. सकाळी सायंकाळी वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असते. त्यात खड्डे असल्याने वाहनधारकांना ते चुकविणेही शक्य नसल्याने वाहतुकीचा वेग कमी करावा लागत आहे. त्यातून वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच ऐंशी फुटी रस्त्यावरही खड्ड्यांचे प्रमाण आहे. पारोळा रोड ते सुभाष चौकापर्यंत रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर पंचवटी चौकातून अंडाकृती बगिच्याकडे वळण घेतल्यावर प्रथम खड्ड्याचाच सामना वाहनधारकाला करावा लागताे. यामार्गावरून लहान पुलाकडे जाता येेते. एसटीही याच मार्गाने जाते. 

अंडाकृती बगिच्याजवळही बऱ्याच दिवसांपासून खड्डे पडले आहेत. खड्ड्यातील खडी रस्त्यावर आल्याने ती धोकेदायक ठरत आहे. त्याचप्रमाणे बारापत्थर चौकाच्या पुढेही मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने बऱ्याचदा वाहनधारकांना अपघाताच्या प्रसंगाला सामाेरे जावे लागले आहे. बारापत्थर पेट्रोल पंपाजवळ वाहतुकीची गर्दी असते. त्यात खड्डे असल्यामुळे येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. महापालिकेसमाेरील महाराणा प्रताप चौकातही खड्डे पडल्याने त्यावरून वाहतूक करताना खड्डे चुकवतच वाहन पुढे न्यावे लागत आहे. शहरातील सर्वच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या रस्त्याची नियमित डागडुजी करणे आवश्यक आहे. मनपाने डागडुजी तरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
 
महिला बाळासह जखमी 
रात्रीचीवेळ आिण खड्डे जीवघेणे ठरत आहेत. महाराणा प्रताप पुतळ्यानजीक मंगळवारी (दि.३) रात्री दुचाकीस्वाराला खड्ड्यांचा दणका बसला. त्यामुळे मागे बसलेली महिला बाळासह रस्त्यात खाली पडली. या वेळी महिला बाळाला जखमही झाली. नागरिकांनी धाव घेत मदत केली; परंतु संबंधित दुचाकीस्वाराचे कुटुंब बाहेर गावचे असल्यामुळे त्यांनी उपचार घेतले नाहीत. हीच स्थिती सध्या शहरवासीयांची झाली अाहे. खड्ड्यांमुळे ब्रेक लावले तर मागील वाहनधारक अंगावर येऊन धडकतो. 

 
बातम्या आणखी आहेत...