आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption News In Marathi, Contractor Are Removing Rock , Divya Marathi

टेकड्या पोखरून ठेकेदार गब्बर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळू व्यावसायिकांना धंद्यात येणार्‍या अडचणी, कारवाईची टांगती तलवार, इतर धोके आणि ‘वाळूमाफिया’च्या लागलेल्या डागामुळे वाळूमाफियांनी आता मुरुमाच्या धंद्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, जळगाव शहराच्या आजूबाजूच्या टेकड्या अवैधरीत्या पोखरून भुईसपाट करण्याचा सपाटा मुरूममाफियांनी लावला आहे. त्यातच घेतलेल्या परवानगीपेक्षा जास्त मुरूम काढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खनिकर्म विभागाकडे गेल्या नऊ वर्षांपासून कायम अधिकारी नसल्याने मुरूममाफियांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून एकही मोठी कारवाई झालेली नाही. परिणामी, दर महिन्याला सुमारे 15 हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काय आहे कायदा आणि शिक्षा ?
राज्य सरकारच्या गौण खनिजविषयक नियमात परवानगीशिवाय जास्त प्रमाणात उत्खनन करणार्‍यांवर किंवा परवानगीशिवाय उत्खनन करणार्‍यांवर कारवाई केली जाते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48नुसार दंडात्मक कारवाई केली जाऊन बाजारभावाप्रमाणे तीनपटीने दंडाची रक्कम वसूल केली जाते. दंड करण्याचे सर्व अधिकार तहसीलदारांना आहेत. याशिवाय खासगी जागांवरील मुरूम खोदण्यासाठीही तहसीलदारांची परवानगी लागते.
फौजदारी कायद्यांतर्गत कारवाई नाही
केंद्र शासनाच्या सन 1957च्या गौण खनिज कायद्यात राज्याला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत; मात्र त्यात एक नियमावली तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी एका सक्षम अधिकार्‍याची नेमणूक करावी, असेही म्हटले आहे. तथापि, राज्य शासनाने तशा सक्षम अधिकार्‍याची 57 वर्षांनंतरही नियुक्ती केलेली नाही. याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊ नये, असा निकाल 24 फेब्रुवारीला खंडपीठात न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी दिल्याचे अँड.एम.ए.जहागीरदार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अनास्थेमुळे अवैध उत्खननप्रकरणी फौजदारी गुन्हाच दाखल होऊ शकत नाही.
खनिकर्म विभागाचा भार प्रभारी अधिकार्‍याच्या खांद्यावर
परवानगी न घेता सुरू आहे मुरुमाची सर्रास वाहतूक
मुरुमाचे दर ब्रासप्रमाणे
टेकड्या पोखरून ठेकेदार गब्बर
उत्खनन
महिनाभरात 15 हजार ब्रास मुरुमाच्या उत्खननाचा धक्कादायक प्रकार
अवैध उत्खनन करणार्‍यांवर कारवाई
4मंडळ अधिकारी आणि तलाठींना अवैध उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अवैध उत्खनन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गोविंद शिंदे, तहसीलदार.
या ठिकाणी आहे परवानगी
जैन इरिगेशन जवळ (शिरसोली रस्ता), मन्यारखेडा, मेहरूण .
येथे होते अवैध उत्खनन
गिरणा पंपिंग, वाघनगर दर्गा, सुप्रीम कॉलनी, पाळधी.
सरकारी
मुरुमासंदर्भातही जनजागृती व्हावी
4वाळूप्रमाणेच मुरुमासंदर्भातही जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण मुरूम पुन्हा तयार करता येत नाही. याशिवाय टेकड्या नष्ट होत असल्याने जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मुरूम वाचवण्यासाठीही मोठय़ा अभियानाची गरज आहे. - वासुदेव वाढे, पर्यावरणप्रेमी
अशी होते चोरी
गौण खनिज (मुरूम) उत्खननासाठी संबंधित तहसीलदार परवानगी देतात; मात्र अनेक ठेकेदार दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करतात, तर काही कोणतीही परवानगी न घेता मुरुमाची वाहतूक करतात. या चोरीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनात खनिकर्म विभाग आहे. तसेच अवैध उत्खनन रोखण्यासाठी पथकही असते; मात्र गेल्या नऊ वर्षांपासून कायम अधिकारी नसल्याने मुरूममाफियांचे चांगलेच फावत आहे.
800
रुपये
200
रुपये
खासगी
अध्र्याच्या वर टेकडी पोखरली
430 वर्षांपूर्वी गिरणा पंपिंग रस्त्यावर मोठी टेकडी होती; मात्र अवैध उत्खनन करणार्‍यांनी ही टेकडी अर्धी पोखरली. याशिवाय त्यांची वाहने रात्र-बेरात्री मुरूम वाहतूक करतात. ए.डी.ब्राrाणकर, स्थानिक रहिवासी, वाघनगर
कायम खनिकर्म अधिकारी नाही
4गेल्या नऊ वर्षांपासून कायम खनिकर्म अधिकारी नाही. यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. उद्योग व ऊर्जा विभागाकडून हे पद भरले जाते. धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी
उत्खननामुळे जमिनीची धूप
4मुरुमाच्या उत्खननामुळे जमिनीची धूप होते. कारण टेकड्या जमिनीचा कस टिकवून ठेवण्याचे काम करतात. अतिउत्खननाने समतोल बिघडतो व पाणीपातळीतही फरक पडतो.