आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापड व्यापार्‍यांकडून एलबीटी बुडवणे सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रेल्वेने मागवलेला माल पकडला जात असल्याने शहरात ट्रकद्वारे रेडिमेड कपडे आणले जात आहेत. रातोरात 74 लाखांचे रेडिमेड कपडे आणून कर बुडवण्याच्या प्रय}ात असलेले चार ट्रक स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पकडले. याप्रकरणी संबंधितांकडून 4 लाख 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दिवाळीच्या काळात व्यापार्‍यांकडून कोलकाता येथून रेल्वेने माल मागवून कर बुडवण्याचा प्रकार उघड झाला होता. मोठय़ा प्रमाणात दंडात्मक कारवाई केल्यानंतही हा प्रकार सुरूच आहे. पश्चिम बंगाल येथून चार ट्रकद्वारे माल येत असल्याची माहिती एलबीटी विभागाच्या पथकाला मिळाली होती. अंधार होण्याची वाट पाहून कालिकामाता परिसरात थांबवून ठेवण्यात आलेले ट्रक (क्रमांक डब्ल्यूबी-23-7773, सीजी-18-1323, सीव्ही 04 एबी 1623, डब्ल्यूबी 11 -8128) गुरुवारी रात्री 12 नंतर गावात येण्यास निघाले. यातील एक ट्रक फुले मार्केटमध्ये माल उतरविण्यासाठी गेल्यावर एलबीटीचे सहायक आयुक्त उदय पाटील यांच्यासह पथकाने चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान आणलेल्या रेडिमेड कपड्यांची पक्की बिले, मालकांची नावे आढळून आली नाहीत. काही पावत्यांवर सांकेतिक नावे तर काहींवर अपूर्ण नावे होती. त्यामुळे चारही ट्रकमधील मालाची तपासणी सुरू केल्यावर 60 ते 70 जणांनी मालावर मालकी दाखवली. माल जप्त करण्याचा इशारा देताच या मालाची किमत 74 लाख रुपये असल्याची कबुली देत दंड भरण्याची तयारी व्यापार्‍यांनी दर्शवली. याप्रकरणी संबंधितांकडून 4 लाख 2 हजार रुपये दंडात्मक वसूल केला. एलबीटीने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.