आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनिंगकडून दीड कोटीचे शुल्क वसूल करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा, जामनेर - धरणगाव, जामनेर तालुक्यातील ज्या जिनिंग-प्रेसिंग कारखानदारांनी कापसावरील शुल्क बाजार समितीकडे भरणा केले नाहीत त्यांच्यांवर कारवाईचा बडगा उचलला गेला आहे.

धरणगाव येथील जिनिंग कारखानदारांकडून 92 लाख, तर जामनेर येथील कारखानदारांकडून 72 लाखांचे शुल्क वसूल करण्यात यावेत, असे आदेश सहायक निबंधक अजय गुजराथी यांनी गुरुवारी (दि.26) दिले. दोन महिन्यांच्या आत जिनिंग कारखानदारांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे भरणा करावयाचा आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजार शुल्क न भरणार्‍या धरणगाव आणि जामनेर येथील जिनिंग फॅक्टरीचालकांवर फी वसुलीचे दावे दाखल करण्यात आले होते. सन 2010-11 आणि सन 2011-12 या दोन हंगामात जिनिंग फॅक्टरीचालकांनी खरेदी केलेल्या कापसावरील बाजार शुल्क अदा केलेला नव्हता. बाजार शुल्क न भरणार्‍या जिनिंग फॅक्टरीचालकांवर या संबंधात दावे दाखल करण्यात आले होते.

या दाव्यांची सुनावणी सहायक निबंधक गुजराथी यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून सुरू होती. या दाव्यांप्रकरणी संबंधित जिनिंग फॅक्टरीचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वेळोवेळी संधी देण्यात आली; मात्र ज्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही, अशांवर राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा 1963च्या कलम 57(3) अन्वये वसुली आदेशाची कारवाई करण्यात आली आहे. बाजार फी वसुली संबंधात सहायक निबंधकांनी आदेश देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, या शक्यतेस गुजराथी यांनी दुजोरा दिला.