आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांत कापसाची वानवा, यंदा 750 कोटींची खरेदी, खासगी बाजारपेठेत भाव गडगडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खासगी स्पर्धेत गेल्या तीन वर्षांत कापसाचे बोंडही खरेदी करू शकणा-या कापूस पणन महासंघाने या वर्षी फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात ७५० काेटी रुपयांचा कापूस खरेदी केला अाहे. खासगी बाजारपेठेत कापसाचे दर गडाडल्याने शेतकऱ्यांसाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र मुख्य अाधार बनले अाहे. महासंघाच्या एकट्या जळगाव विभागातील १२ केंद्रांवर लाख ४४ हजार ५७९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात अाला अाहे.
जागतिक बाजारात कापूस गाठींना मागणी नसल्याने या वर्षी खासगी जिनिंग उद्याेग बंद पडले अाहेत. कापसाला मागणीच नसल्याने खासगी बाजारात भावदेखील खूपच खाली अाले अाहेत. गेल्या तीन वर्षांत खासगी बाजारात कापूस हजारांपेक्षा अधिक दराने विक्री हाेत असल्याने ४०५० रुपये हमीभाव असलेल्या शासकीय खरेदी केंद्रांवर संपूर्ण हंगामात एक क्विंटल कापूसदेखील खरेदी केला जात नव्हता. यावर्षी खासगी बाजारातील भाव शासकीय हमीभावापेक्षा कमी असल्याने शासकीय केंद्र बाजारपेठेतील प्रमुख अाधार बनले अाहेत. सीसीअाय अाणि कापूस पणन महासंघाचे एकूण २५ केंद्र विभागात अाहेत.
पुढील आदेशापर्यंत केंद्र सुरू
बाजारातकापसाला मागणी नसल्यामुळे अामच्या खरेदी केंद्रांवर यावर्षी पावणेदाेन काेटी क्विंटल कापूस खरेदी करण्यात अाला अाहे. खरेदी केंद्र कधीपर्यंत सुरू ठेवावे, यासंदर्भात शासनाचे पुढील अादेश अाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. डाॅ.एन. पी. हिराणी, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ
सीसीअायची १३ केंद्र
जळगावविभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार अाणि नाशिक िजल्ह्यांत फेब्रुवारीपर्यंत १२ केंद्रांवर लाख ४४ हजार ५७९ क्विंटल कापूस खरेदी केला अाहे. सीसीअायची सब एजंट एजन्सी असलेल्या पणन महासंघाचे चार िजल्ह्यांत केवळ १२ केंद्र अाहेत. जळगाव विभागात सीसीअायची १३ खरेदी केंद्र अाहेत. पणन महासंघाचे धुळे, नवापूर, रावेर, साक्री, मुक्ताईनगर, मालेगाव, अमळनेर, शिरपूर, पाराेळा, चाेपडा, धरणगाव या ठिकाणी केंद्र अाहेत.
हजार रुपयांचा ताेटा
शासकीयखरेदी केंद्रावर कापसाच्या गुणवत्तेनुसार ४०५० रुपये, ३९५० रुपये या दराने पणन महासंघाकडून कापूस खरेदी केला जात अाहे. या कापसापासून बनवण्यात येणारी कापूस गाठ ही खंडीला ३५ हजार रुपये दराने पडते. तर विक्री करताना ३२०० रुपये भाव मिळते. खंडीमागे हजारांचे नुकसान हाेत असल्याची स्थिती अाहे.