आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cotton Producing Issue At Jalgaon, Divya Marathi

क्षेत्र अन् उत्पादन वाढूनही निर्यातीवरच ठरतील भाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - या वर्षात कापसाच्या क्षेत्रापाठोपाठ उत्पादन वाढण्याचे संकेत असले तरी दरासंदर्भाचे भवितव्य मात्र चीनच्या आयात धोरणावर अवलंबून आहे. इतर देशांच्या तुलनेत कापसाचा मोठा खरेदीदार असलेल्या चीनने या हंगामात देशांतर्गत साठा खुला केला होता. दरम्यान, या वर्षात चांगला भाव मिळण्यासाठी भारताचे निर्यात धोरण आणि चीनची मागणी या दोन गोष्टी परिणामकारक ठरणार आहेत.

जगातील क्रमांक दोनचा कापूस उत्पादक देश असलेला भारतीय कापूस बाजारपेठेवर चीन बाजारपेठेचा मोठा प्रभाव आहे. उत्पादन जास्त असले तरी खरेदीदार म्हणून चीन हा सर्वात मोठा देश आहे. या वर्षाच्या हंगामात चीन सरकारने देशांतर्गत कापसाचा साठा खुला केल्याने भारतातून कापूस निर्यात होऊ शकली नाही. पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांच्या भरवशावर 80 लाख गाठींची निर्यात होऊ शकली. हंगाम संपत आला असताना आता दररोज 1 लाख गाठींचे उत्पादन होत आहे. दरम्यान, यावर्षी संधी नसली तरी येत्या हंगामात चीनची दारे उघडतील या आशेने मोठय़ा उद्योजकांनी चांगल्या कापूस गाठींचा साठा केला आहे.
चीनच्या धोरणाकडे लक्ष
यावर्षी भारतीय कापसासाठी बंद असलेले चीनचे दरवाजे येत्या हंगामात उघडणार की नाही, याकडे जागतिक कापूस व्यापार्‍यांचे लक्ष लागून आहे. चीनने या वर्षात देशांतर्गत साठा वापरला असला तरी तिकडे उत्पादन वाढल्याने तो साठा केला जाऊ शकतो. येत्या हंगामात गरज भागवण्यासाठी भारतीय कापूस आयात करण्याचा निर्णय घेतल्यास कापसाचे भाव वधारतील, अन्यथा कापसाचे दर आहे त्यापेक्षाही कोसळण्याची भीती आहे.
दरावर या गोष्टींचा परिणाम
कापसाचे जागतिक उत्पादन, विविध देशांमधील मागणी आणि साठा, जागतिक कापसाचे दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, देशाचे कापूस निर्यात धोरण, चीनसह प्रमुख देशांची मागणी, देशांतर्गत साठा आणि मागणी, कृषिमूल्य आयोगाचे दर, शासकीय खरेदी धोरण आणि सरकीचे दर.