आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाच्या लागवड क्षेत्रात 70 हजार हेक्टरने घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील सर्वात मोठे नगदी पीक असलेल्या कापसाच्या लागवड क्षेत्रात 70 हजार हेक्टरने घट झाली आहे. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे आधीच कापूस उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना लागवड क्षेत्रात घट झाल्याने भर पडली आहे. त्याचा थेट फटका जिल्ह्यातील कापूस प्रक्रिया उद्योगाला देखील बसण्याचे संकेत आहेत.
गेल्या पाच वर्षांत चार हजार 500 हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र वाढले होते. दुसरे ठोस पर्यायी पीक नसल्याने नगदी पीक म्हणून शेतकर्‍यांचा कापसाकडेच अधिक कल असतो. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने कापसाची लागवड घटली आहे. 15 जुलैनंतर झालेली लागवड फारशी फायद्याची नसल्याने शेतकरी लवकर येणार्‍या पर्यायी पिकांकडे वळले आहेत. एक ते सव्वालाख हेक्टरवर जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे. उर्वरित लागवड उशिरा झाल्याने उत्पादनात 20 ते 25 टक्के घट येण्याची शक्यता आहे.