आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस व्यापारी खूनप्रकरणी साक्षीदारांनी अाेळखले मृताचे कपडे, साहित्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एरंडाेल येथील बाळू रामू पाटील यांच्या खूनप्रकरणी बुधवारी न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात तीन साक्षीदारांची साक्ष झाली. सुनावणीत जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी तर अाराेपीतर्फे अॅड. अार. के. पाटील, अॅड. एम. ई. जाधव, अॅड. अकील इस्माईल यांनी उलट तपासणी घेतली. मरणाेत्तर पंचनाम्याचे जप्ती पंच सुभाष पाटील यांनी साक्षीदरम्यान त्यांच्या समक्ष पाेलिसांनी पंचनामा केल्याचे सांगितले. पंचनामा करताना बाळू पाटील यांच्या अंगावरील जखमांची स्थितीही त्यांनी या वेळी न्यायालयासमाेर सांगितली. तसेच मृताचे कपडे त्यांच्या समाेरच पाेलिसांनी जप्त केल्याचे सांगितले.
न्यायालयात त्यांनी कपडे, साहित्य अाेळखले. या प्रकरणातील घटनास्थळचे पंच साक्षीदार चुडामण बळीराम पाटील यांनी मधुकर राेकडे यांनी मृतदेह दाखवून घटनास्थळचा पंचनामा समाेर केल्याचे सांगितले. तर पाटील यांच्या माेटारसायकल जप्ती पंचनाम्याचे पंच सदानंद दत्तात्रेय पाटील यांनी माेटारसायकल त्यांच्या समाेर जप्त केल्याची साक्ष दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी १९ जानेवारीला हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...