आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय महत्त्वाकांक्षेने देशमुख-सपके संघर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३६मध्ये विद्यमान नगरसेवक पराभूत उमेदवारामध्ये सफाईच्या मुद्द्यावरून सुरू झालेला संघर्ष हा राजकीय महत्त्वकांक्षेतून असल्याचे उघड बाेलले जात अाहे. पालिकेच्या निवडणुकीला अद्याप दाेन वर्षांचा अवकाश असताना मात्र राजकीय भवितव्याच्या चिंतेतून एकमेकांवर अाराेपांचे सत्र सुरू झाले अाहे.
मनपाच्या प्रभाग क्रमांक ३६मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी विनाेद देशमुख निवडून अाल्या अाहेत. याच प्रभागात उमेदवारी केलेले नितीन सपके यांचा मात्र पराभव झाला अाहे. नुकतीच नगरसेविका देशमुख यांनी त्यांच्या प्रभागातील साफसफाईचा मक्ता असलेल्या सहजीवन सहराेजगार सेवा सहकारी संस्थेचे संचालक नितीन सपके त्यांचे मेहुणे अजय राम जाधव यांच्याविरुद्ध लेखी तक्रार केली अाहे. प्रभागात साफसफाई हाेत नसल्याने त्यांनी यापूर्वी तक्रार केली हाेती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पाहणी करून संस्थेवर दंडात्मक कारवाईदेखील केली अाहे. त्यामुळे सपके जाधव यांनी देशमुख यांच्या घरी येऊन धमकावल्याचे अायुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे. तर सपके यांनीही देशमुख यांच्याकडून त्रास हाेत असल्याची तक्रार अायुक्तांकडे केली अाहे.

वादामागे राजकारण?
देशमुखनगर सेविका असलेल्या वाॅर्डात यापूर्वी त्यांच्यात हितचिंतकांनी साफसफाईचा मक्ता घेतल्याचे सर्वश्रुत अाहे. अाता मात्र सपके यांनी मक्ता घेतला अाहे. भविष्यात मनपा निवडणूक असून त्यात सपके हे प्रतिस्पर्धी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात सपकेंनी साफसफाईच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केल्याने या वादामागे राजकारण असल्याचेही बाेलले जात अाहे. दरम्यान, देशमुख सपके यांच्या बाजूने बाेलणारे अनेक पुढे येत असून कामाची तुलना केली जात अाहे.

दंडात्मक कारवाई करा
दाेन राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वादात नागरिकांना असुविधा मिळू नये, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. पालिकेच्या अाराेग्य विभागाने शहरातील सर्वच भागातील अस्वच्छतेकडे लक्ष देऊन काम करणाऱ्या मक्तेदारांवर दंडात्कम कारवाई करावी, अशी मागणी हाेऊ लागली अाहे.

उमेदवारांचा अंदाज
देशमुख सपके यांच्या वादामुळे दाेन वर्षांनंतर हाेणाऱ्या पालिका निवडणुकीचे वारे अातापासून वाहायला लागले अाहेत. त्यामुळे महाबळ परिसरात अाणखी काेण काेण उमेदवार असतील, याबाबत अाता महापालिका वर्तुळात अंदाज वर्तवले जात अाहेत.
बातम्या आणखी आहेत...