आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्याधिकारी पाठवणार नगरसेवक उल्हास पगारेंच्या अपात्रतेचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेचे नगर अभियंता प्रवीण जोंधळे यांना नगरसेवक उल्हास पगारे त्यांच्या समर्थकांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणाचे पडसाद मंगळवारी पालिकेत उमटले. पालिकेच्या अास्थापनेवरील ९० कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी नगरसेवक उल्हास पगारे यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी दिली.
नगरसेवक पगारे यांच्यासह समर्थकांनी केलेल्या अरेरावीबद्दल त्वरित अटक व्हावी, या मागणीसह या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. अत्यावश्यक सेवा असलेल्या पालिका दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनीदेखील बाह्यरुग्ण तपासणी बंद केली. मात्र, प्रसूती अत्यावश्यक गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सकाळी काळ्या फिती लावून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, शहरातील आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही. कर्मचारी मारहाणप्रकरणी शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार नगरसेवक उल्हास पगारे यांच्या अपात्रतेबाबत मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर प्रस्ताव पाठवणार आहेत. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने राजकारणदेखील तापले आहे. दरम्यान, कामबंद आंदोलन केलेल्या कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, त्याचा शहरातील विकासात्मक कामांवर परिणाम होऊ नये, म्हणून हे आंदोलन मागे घेऊन बुधवारपासून पालिकेतील कामकाज सुरळीत होईल, असे मुख्याधिकारी बाविस्कर यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : पालिकाकर्मचाऱ्यांनी प्रांताधिकारी, डीवायएसपींसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत समस्या मांडली. यापूर्वीही लेखापाल अॅब्युलन्स चालकाला मारहाण करण्यात आली होती. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रामुख्याने याच प्रकारांमुळे भुसावळात कर्मचारी काम करण्यास तयार नाहीत. यामुळे दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. सावदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनदेखील काळ्या फिती लावून निषेध केला.

नगरसेवकांचे निवेदन
हाप्रकार निंदनीय आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन पगारे यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्यात यावे, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपचे रमण भोळे, खाविआचे गटनेते किरण कोलते, भाजपचे गटनेते प्रमोद नेमाडे, अपक्ष नगरसेवक निर्मल कोठारी यांच्यासह अन्य १९ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ãकर्मचाऱ्यांना अरेरावी करणे हा प्रकार निंदनीय आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने आता कर्मचाऱ्यांनी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून पुन्हा कामावर हजर व्हावे. बुधवारपासून कामकाज सुरू करून नागरिकांना पूर्ववत सेवा द्याव्यात. याबाबत आपण पालिका कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. शेवटी शहरातील जनतेची सेवा सर्वाधिक महत्त्वाची आहे . अख्तरपिंजारी, नगराध्यक्ष

Ãपालिकेच्या कर्मचाऱ्यांनासत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटातील नगरसेवकांकडून नगराध्यक्षांसमोर मारहाण होणे, हा प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित नगरसेवक पगारे यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, याबाबत निवेदन दिले आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांची दांडगाई या निमित्ताने पुन्हा शहरवासीयांसमोर आली.
युवराजलोणारी, उपनगराध्यक्ष

Ãपोलिसांनी नगरसेवकासहतीन जणांना अटक करून कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण केली आहे. शासनाने यापूर्वी दिलेल्या अध्यादेशाचा आधार घेऊन नगरसेवक पगारे यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे. शहरातील विकासकामांवर परिणाम होऊ नये म्हणून बुधवारपासून नियमित कामे सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी
बातम्या आणखी आहेत...